145 प्रवासी घेऊन जाणाऱ्या Air India फ्लाइटचा पायलट नशेत? टर्ब्युलन्समुळे 17 जण रुग्णालयात दाखल

Air India Flight : फुकेटहून दिल्लीला 4 ऑगस्ट च्या एअर इंडियाच्या विमानाला टर्ब्युलन्सचा सामना करावा लागला होता. तर आता या विमानाच्या

Air India Flight

Air India Flight : फुकेटहून दिल्लीला 4 ऑगस्ट च्या एअर इंडियाच्या विमानाला टर्ब्युलन्सचा सामना करावा लागला होता. तर आता या विमानाच्या कॅप्टनबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. कॅप्टनची डोप चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. फ्लइट AI379 ला हवेत असताना टर्ब्युलन्सचा सामना करावा लागला होता. ज्यामुळे विमान अचानक तब्बल 300 फुट खाली आले होते. यानंतर विमान दिल्लीत उतरल्यानंतर पायलटची डोप चाचणी घेण्यात आली होती. तर दुसरीकडे एअर इंडियाकडून आतापर्यंत या पॉझिटिव्ह निकालाची पुष्टी करण्यात आलेली नाही तसेच त्यांनी नकार देखील दिलेला नाही. या विमानात 137 प्रवासी आणि आठ कर्मचारी होते.

आम्हाला याची जाणीव आहे की लागू नियमांनुसार पायलट्सची उड्डाणानंतर तपासणी करण्यात आली होती. मात्र आतापर्यंत चाचणीचे निकाल आम्हाला कळवण्यात आले नसल्याची माहिती एअर इंडियाकडून (Air India) देण्यात आली आहे. तर दुसरीकडे या घटनेबाबत नागरी हवाई वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू (K. Rammohan Naidu) यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. 4 ऑगस्ट रोजी फुकेटहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात चार ते पाच मिनिटे तीव्र वातावरणीय (Turbulence) चढ- उतार जाणवले (Phuket-Delhi Air India flight) असून काही कर्मचाऱ्यांना दुखापत देखील झाली असल्याची माहिती मंत्री के.राममोहन नायडू यांनी दिली.

विमानात 145 प्रवासी

नागरी उड्डाण नियमांचे पालन करून एअर इंडिया आपल्या कर्मचारी वर्गाची (क्रू मेंबर्स) नियमितपणे अंमली पदार्थांची चाचणी करते. या चाचण्या विशिष्ट उड्डाणे किंवा प्रत्यक्ष घडलेल्या घटनांशी संबंधित चाचण्यांपेक्षा वेगळ्या असतात. विमान कंपनीने सांगितले की, आवश्यकतेनुसार संबंधित अधिकाऱ्यांना सहकार्य करणे सुरूच ठेवले जाईल. 145 प्रवाशांना घेऊन जाणारे एअरबस A320 विमान ओडिशानजीक तीव्र टर्ब्युलन्समध्ये सापडले आणि अचानक 300 फूट खाली आले. दिल्लीत पोहोचल्यावर 13 प्रवासी आणि चार कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

… तर यशस्वी जैस्वालवर 4 सामन्यांची बंदी; रहाणेने केला सर्वात मोठा खुलासा –

DGCA कडून तपास

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन’ (DGCA) या प्रकरणाच्या प्रत्येक पैलूचा तपास करत आहे. यामध्ये टर्ब्युलन्सच्या घटनेचे व्यवस्थापन योग्यरित्या केले गेले होते का, ही घटना हवामानामुळे घडली की इतर कारणांमुळे, विमानावर झालेला संभाव्य परिणाम (उदा. टर्ब्युलन्समुळे हायड्रोलिक बिघाड झाला का), आणि दिल्लीकडे प्रवास सुरू ठेवण्याऐवजी विमान वाराणसी किंवा लखनौसारख्या जवळच्या विमानतळाकडे वळवायला हवे होते का, या बाबींची तपासणी केली जात आहे.

follow us