Maharashtra Kesri : पुण्यातील मुळशीचा ‘वाघ’ पृथ्वीराज मोहोळ नवा महाराष्ट्र केसरी

  • Written By: Published:
Maharashtra Kesri : पुण्यातील मुळशीचा ‘वाघ’ पृथ्वीराज मोहोळ नवा महाराष्ट्र केसरी

Maharashtra Kesri Wrestling competition : पुण्यातील मल्ल पृथ्वीराज मोहोळ (Prithviraj Mohol) हा 67 व्या वरिष्ठ महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा मानकरी ठरला आहे. त्याने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला पराभूत केले. गायकवाड याने लढतीतून माघार घेतल्यानंतर मोहोळ याला पंचांनी विजयी घोषित केले. त्यानंतर मोहोळ आणि त्याच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष केला.

विजयी पृथ्वीराज मोहोळ याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मानाची गदा देण्यात आली. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, युवक व क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार अरुण जगताप यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

सुरुवातीलाच पृथ्वीराज मोहोळ याने एक गुण घेतला. त्यानंतर मोहोळ याने दुसरा गुण घेतल्यानंतर महेंद्र गायकवाडने पंचांच्या निर्णयाविरोधात नाराजी बोलून दाखविले.पृथ्वीराजला दुसरा गुण हा चुकीच्या पद्धतीने देण्यात आल्याचं त्याचं मत होतं. त्यामुळे नाराजी व्यक्त करत त्याने मैदान सोडले.

सामन्याच्या दरम्यान काही प्रेक्षकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी लगेच हस्तक्षेप करून त्यांना बाजूला केलं. त्याचवेळी महेंद्र गायकवाडने मैदान सोडलं.

अंतिम सामन्यानंतर काही वेळ गोंधळाचे वातावरण तयार झाले होते.अहिल्यानगरमध्ये रंगलेल्या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत (Maharashtra Kesri Wrestling competition) मॅट विभागात पृथ्वीराज मोहोळ विजयी ठरलायं. माती विभागाच्या अंतिम लढतीत सोलापुरच्या महेंद्र गायकवाड याने साकेत यादवचा पराभव केला. त्यानंतर पृध्वीराज मोहोळ विरुद्ध महेंद्र गायकवाड यांच्यात महाराष्ट्र केसरीसाठी लढत झाली.


पराभवानंतर शिवराज राक्षेचा राडा, पंचाला केली मारहाण

मॅट विभागात नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात अंतिम फेरीची लढत झाली. या लढतीत पृथ्वीराज मोहोळ शिवराज राक्षेचा पराभव केला. या लढतीदरम्यान राक्षे समर्थक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आम्हाला अंतिम निर्णय मान्य नसल्याचा पवित्रा राक्षे समर्थकांनी घेतला. पंचाच निर्णय चुकीचा असल्याचं राक्षे याने म्हटलंय. यावेळी संतप्त झालेल्या शिवराजने पंचाला लाथ मारल्याचं दिसून आलं. यावेळी पोलिसांनी हस्ततक्षेप करीत वाद मिटवला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube