प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया हल्ला प्रकरण; शिवसेना प्रवक्ते संजीव भोरसह 17 जणांना शिक्षा

Dr. Prakash Kankariya attack case Sanjiv Bhor and 17 people sentenced: अहिल्यानगरमधील प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया (Prakash Kankariya) यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी आरोपींना 17 वर्षांनंतर शिक्षा सुनाविण्यात आली आहे. सध्या शिवसेनेचे (शिंदे गट) प्रवक्ते असलेले संजीव बबनराव भोर (Sanjiv Bhor) यांच्यासह 17 जणांना एक वर्षाची साधी कैद आणि 11 हजारांचा दंड अशी शिक्षा देण्यात आली आहे.
2034 पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री, चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान
जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. सहारे यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला आहे. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अर्जुन पवार, केदार केसकर यांनी काम पाहिले आहे. भोर (रा. पाईपलाईन रोड, अहिल्यानगर) यांच्यासह महादेव परशुराम भगत (रा. कापूरवाडी), बलभीम परशुराम भगत (रा. कापूरवाडी), बाबासाहेब बाबुराव जरे (रा. इमामपूर), संतोष विठ्ठल वाडेकर (रा. देसवडे, ता. पारनेर), आदिनाथ शंकरराव काळे (रा. वांजोळी, ता. नेवासा), रमेश अशोक बाबर (रा. बुरुडगाव रोड, अहिल्यानगर), आरोपी मयत किशोर सुनील आर्डे), अरुण बाबासाहेब ससे (रा. जेऊर), संदीप शंकर पवार (रा. एम.आय.डी.सी), शरद गंगाधर (रा. एम.आय.डी.सी), कैलास शिवाजी पठारे (रा. जेऊर), योगेश गोविंद आर्डे (रा. मल्हार नगर, एम.आय.डी.सी), गणेश जितेंद्र शिंदे (रा. एम.आय.डी. सी), विठ्ठल उमेश गुडेकर (रा.एम.आय.डी.सी), बापू बाबासाहेब विरकर (रा.एम.आय.डी.सी), सागर कडुबा घाणे (रा. नवनागापूर) असे शिक्षा झालेल्या आरोपींचे नावे आहेत.
काय आहे प्रकरण ?
डॉ. प्रकाश कन्हैयालाल कांकरिया यांच्याकडे 2008 एक महिला पेशंट आलेली होती. तपासणीसाठी घेण्यात आलेली शंभर रुपयांच्या फीवरून तिच्या पतीने हॉस्पिटलमध्ये घुसून कांकरिया यांना मारहाण करून तोडफोड केली होती. त्याबाबत कांकरिया यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर महिलेच्या फिर्यादीवरून कांकरिया यांच्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार नोंदवली होती. त्यानंतर वीस ते पंचवीस लोक हॉस्पिटलमध्ये घुसले. विनयभंगाची तक्रार मिटविण्यासाठी 11 लाखांची मागणी केली होती. त्यानंतर आरोपींनी हॉस्पिटलची तोडफोड केली. तसेच कांकरिया यांना काळे फासून त्यांची माणिक चौक ते कापड बाजार अशी धिंड काढली होती. याप्रकरणी कांकरिया यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला होता.