19 वर्षीय तरुणाची सुप्रीम कोर्टात ऐतिहासिक झुंज; स्वतः युतीवाद करून जिंकली MBBS प्रवेशाची लढाई

19 वर्षीय अथर्व चतुर्वेदी या तरुणाने आपल्या शिक्षणाच्या हक्कासाठी थेट सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया गाठत एक वेगळीच लढाई लढली आणि ती जिंकूनही दाखवली.

  • Written By: Published:
Untitled Design 46

Won the battle for MBBS admission by forming alliances : मध्य प्रदेशातील जबलपूर येथील 19 वर्षीय अथर्व चतुर्वेदी या तरुणाने आपल्या शिक्षणाच्या हक्कासाठी थेट सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया गाठत एक वेगळीच लढाई लढली आणि ती जिंकूनही दाखवली. अथर्वने बारावी उत्तीर्ण केल्यानंतर मेडिकल क्षेत्रात जाण्याचा निर्धार केला होता. त्याने नीट परीक्षा एकदा नव्हे, तर दोन वेळा उत्तीर्ण केली. दुसऱ्या प्रयत्नात त्याला 530 गुण मिळाले. तो आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रवर्गात येतो.

मात्र, खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ईडब्ल्यूएस कोट्याची अंमलबजावणी न झाल्याने त्याला प्रवेश मिळू शकला नाही. पात्रता असूनही केवळ प्रशासकीय दुर्लक्षामुळे त्याचे डॉक्टर होण्याचे स्वप्न अडखळले. या अन्यायाविरोधात अथर्वने न्यायालयीन लढा उभारण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे त्याने कोणत्याही वकिलामार्फत बाजू न मांडता स्वतःच सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करण्याचा निर्धार केला.

सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठाने उठण्याचा प्रयत्न केला असताना, मला दहा मिनिटे बोलण्याची संधी द्या, अशी विनंती करणारा आवाज कोर्टात घुमला. तो आवाज होता अथर्व चतुर्वेदीचा. अथर्वने भारतीय संविधानाच्या कलम 142 अंतर्गत प्रभावी युक्तिवाद सादर केला. त्याच्या मुद्देसूद आणि अभ्यासपूर्ण मांडणीने खंडपीठाला प्रकरण गांभीर्याने घ्यावे लागले.

कोकणातील जमीन गुजराती उद्योगपतींच्या घशात? नार्वेकरांवर संजय राऊतांचा थेट हल्ला

सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने National Medical Commission (एनएमसी) आणि मध्य प्रदेश सरकारला निर्देश दिले की, खासगी महाविद्यालयांमध्ये ईडब्ल्यूएस आरक्षण अधिसूचित न केल्याने पात्र विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे 2025-26 या शैक्षणिक सत्रासाठी ईडब्ल्यूएस प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना प्रोव्हिजनल एमबीबीएस प्रवेश देण्यात यावा.

अथर्वने केवळ एक केस जिंकली नाही, तर स्वतःसारख्या अनेक विद्यार्थ्यांसाठी न्यायाचा मार्ग खुला केला. त्याची ही लढाई शिक्षणाच्या हक्कासाठी उभे राहण्याची प्रेरणादायी कहाणी ठरली आहे. याआधी जबलपूर उच्च न्यायालयात युक्तिवाद करताना न्यायाधीशांनी त्याला गंमतीत म्हटले होते, डॉक्टर कशाला, वकील व्हा! तुम्ही चुकीच्या क्षेत्रात जात आहात. पण अथर्वने सिद्ध करून दाखवले की तो डॉक्टरही होऊ शकतो आणि गरज पडल्यास स्वतःचा वकीलही!

follow us