उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना नक्कीच फूटली, पण…
विधीमंडळाचा पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला असे म्हणता येणार नाही. असा युक्तीवाद शिवसेनेचे वकिल कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात केला.
Sanjay Raut commented on the ongoing case over the Shiv Sena’s election symbol: विधीमंडळाचा पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला असे म्हणता येणार नाही. असा युक्तीवाद शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वकिल कपिल सिब्बल यांनी काल (5 ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयात केला, असे खासदार संजय राऊत म्हणाले. एका पक्षातून एका चिन्हावर निवडून येवून जर निवडून आलेले लोकप्रतिनिधी दुसऱ्या पक्षात जात असतील तर हे बेकायदेशीर आहे, अशाने लोकशाहीला आणि संविधानाला काही अर्थ राहणार नाही, असेही संजय राऊत म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि त्याचे मुळ चिन्ह यावर सुनावणी सुरु आहे, त्यावर संजय राऊत बोलत होते.
Shiv Sena Supreme Court Hearing : एकनाथ शिंदेंना धक्का; धनुष्यबाण हातून जाणार?
एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधींनी दुसऱ्या पक्षात प्रवेश करणे हे बेकायदेशीर आहे. अशा प्रकारे लोकप्रतिनिधी पक्षांतर करू लागले, तर लोकशाही आणि संविधानाला काहीही अर्थ उरणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.
Amit Shah : विरोधकांवर हल्लाबोल, आज संसदेत उत्तर देणार गृहमंत्री अमित शाह?
“उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील विधीमंडळ पक्षात नक्कीच फूट पडली. काही जण अमित शहांमुळे, तर काही जण लोभापोटी निघून गेले. मात्र, मूळ शिवसेना पक्ष फुटलेला नाही. त्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह मूळ शिवसेनेकडेच राहायला हवे.” हीच भूमिका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात मांडण्यात आल्याचेही राऊत यांनी सांगितले.
झारखंडमधील विद्यार्थी आंदोलक उपोषणावर; अभिजीत दिपकेचा आंदोलनाला पाठींबा
दरम्यान, शिंदे गटाबाबतही संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. “मला मिळालेल्या माहितीनुसार समोरच्या पक्षात चलबिचल सुरू आहे. दुसऱ्या पक्षात विलीन होण्याच्या चर्चा त्यांच्यात सुरू आहेत,” असा दावा राऊत यांनी केला. शिवसेनेतील फूट, पक्षाचे मूळ अस्तित्व आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हावरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईच्या पार्श्वभूमीवर राऊत यांच्या या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. आता सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकडे दोन्ही गटांचे लक्ष लागले आहे.