… तर गोपीनाथ मुंडेंचे प्राण वाचले असते; पृथ्वीराज चव्हाणानंतर संजय राऊतांचा मोठा दावा

Sanjay Raut On Gopinath Munde :  भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते असा दावा राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि

Sanjay Raut On Gopinath Munde

Sanjay Raut On Gopinath Munde :  भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते असा दावा राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एका मुलाखतीमध्ये केल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर आता यावर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील खळबळजनक दावा केला आहे. तेव्हा आम्ही दिल्लीतच होते ते खरंय. गोपीनाथराव आज काँग्रेसमध्ये असते तर त्यांचे प्राण वाचले असते असं माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले.

माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, गोपीनाथ मुंडेंना (Gopinath Munde) शरद पवारांनीही हाच सल्ला दिला होता. ही जुनी बातमी आहे कारण भाजपमध्ये त्यांचा छळ होत होता. मानसिकदृष्या आघात केले जात होते. ते शरद पवारांनाही भेटले होते हे खरं आहे. मात्र मनमोहन सिंग हे सज्जन गृहस्थ होते त्यांनी सल्ला दिला तुम्ही आहात तिथेच थांबा. कदाचित जर ते काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते असं माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले.

तर दुसरीकडे माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर देखील जोरदार हल्लाबोल केला. लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लोकसभेत बोलताना इडियट, अंधभक्त शब्द वापरल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली. त्यावर मला देखील नोटीस आली आहे. महाराष्ट्राच्या एका मंत्र्याला मी साताराच्या येड** म्हंटले मला नोटीस आली. इडिटय हा अनपार्लिमेंट शब्द आहे का? तो एक चित्रपट आला होता त्याला अनेक पुरस्कार मिळाले आहेत असं देखील संजय राऊत म्हणाले. राहुल गांधी यांना जर नोटीस आली असेत तर सरकराचा मूर्खपणा आहे. राहुल गांधी बरोबर बोलले यात चुकीचे काही नाही असेही संजय राऊत म्हणाले.

नेमकं काय म्हणाले होते पृथ्वीराज चव्हाण ?

मी मुख्यमंत्री असताना भाजप नेते गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. या प्रवेशासाठी त्यांनी केंद्रात मंत्रिपदाची अट घातली होती. नागपूरचे दोघे नेते मला निवडणुकीत पाडतील अशी त्यांनी म्हटलं होते असा दावा एका मुलाखतीमध्ये बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

Street Fighter स्टार विद्युत जामवाल पुन्हा चर्चेत; भारतीय मार्शल आर्ट्सचे केले प्रदर्शन-

follow us