देशमुखांनी जिल्हा बँक कशी खेचून आणली ? निलंगेकरांना महायुतीतून धोबीपछाड !
Latur DCC bank Election: धीरज देशमुखांनी 14 जागा जिंकत बँक ताब्यात घेतली. पण महायुतीचे नेते बरोबर घेऊन धीरज देशमुखांनी हे कसं घडवून आणलं,
Latur DCC bank Election: लातूर जिल्हा बँक ताब्यात घेण्यासाठी भाजपचे नेते व आमदार संभाजीराव निलंगेकर पाटील यांनी सर्व शक्तीपणाला लावली होती. बँकेतून हजारो कोटी रुपये देशमुख कुटुंबाने वापरले, नातेवाईकांना कर्ज दिल्याचे गंभीर आरोप निलंगेकरांचे होते. त्याला बँकेचे अध्यक्ष व पॅनेलचे अध्यक्ष धीरज देशमुखांनी संयमीत उत्तर दिले. जिल्हा बँक निलंगेकरांच्या ताब्यात जाणार असे राजकीय चर्चा सुरू झाली होती. कारण जिल्ह्यात महायुतीची ताकद होती. पण धीरज देशमुखांनी 14 जागा जिंकत बँक ताब्यात घेतली. पण महायुतीचे नेते बरोबर घेऊन धीरज देशमुखांनी हे कसं घडवून आणलं, बँक कशी ताब्यात घेतली पाहुया..
1987 ला बँकेच्या स्थापनेपासून 40 वर्ष लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देशमुखांच्या ताब्यात राहिलेली. लातूर बँकेचे सध्याचे चेअरमन धिरज देशमुख यांनी बँकेच्या निवडणुकीत पॅनेल उतरविले. लातूरमध्ये देशमुख घराणाची ताकद कमी होत असल्याने त्यांनी बँक आपल्याकडे ठेवण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावलेली होती. कारण लातूर ग्रामीणमध्ये झालेला पराभवामुळे त्यांना बँक राखणे गरजेचे होते. तिकडे महायुतीची ताकदही जास्त होती. जिल्ह्यात सहापैकी पाच जागेवर महायुतीचे आमदार होते. देशमुखांसाठी ही निवडणूक अतीकठीण झाल्याची राजकीय चर्चा होती. विरोधकांनी देशमुखांना बॅकफूटला ढकलले होते. भाजपचे नेते व आमदार संभाजी पाटील निलंगेकरांनी आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांनी गेम फिरविला
या निवडणुकीत खरा गेम फिरविला तो सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी. महायुतीमध्ये असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब पाटील यांनी देशमुख यांच्या सहकार पॅनलमध्ये आले. तर औसा सोसायटी मतदारसंघातून भाजप आमदार अभिमन्यू पवार यांच्या पत्नी शोभा पवार बिनविरोध झाल्या. देशमुखांच्या उमेदवाराने माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. पण अभिमन्यू पवारांना आपल्याकडे वळवून धीरज देशमुखांना संभाजी निलंगेकर पाटील यांना मोठा धक्काच दिला. या मागे जुने राजकारण आहे. 2021 अहमदपूरच्या नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी-भाजपमध्ये संघर्ष झाला. दोन्ही वेगळेवेगळे लढले होते. नगराध्यक्षपद भाजपला गेले. तर बहुमत राष्ट्रवादीला गेले होते. तेथे निलंगेकरांना शब्द फिरविल्याचा आरोपही बाबासाहेब पाटील यांनी केला होता. त्याचा राग बाबासाहेब देशमुखांना होता. तर जिल्हा बँक अध्यक्ष निवडीत अभिमन्यू पवार आणि संभाजी निलंगेकरांमध्ये वाद झाला होता. निलंगेकरांनी
उषा पाटील तळेगावकरांना अध्यक्ष केले. त्यामुळे ते नाराज होते.
काका दिलीपराव देशमुखांनी राबवली यंत्रणा
या निवडणुकीत धीरज देशमुख खूप मोठी मदत झाली ती काका दिलीपराव देशमुखांची. बँकेचे अध्यक्ष राहिलेले, तीन टर्म विधानपरिषदेचे सदस्य असलेले दिलीपराव देशमुखांनी योग्य यंत्रणा राबवत धीरज देशमुखांच्या पॅनेलच्या विजयात मोठी जबाबदारी पार पाडत देशमुख कुटुंबात ताब्यात बँक ठेवली आहे.
संभाजी निलंगेकर स्ट्रॉग वॉच ठेवणार ?
संभाजी निलंगेकरांच्या परिवर्तन पॅनलला चार जागा मिळाल्या आहेत. त्यात निलंगातून अरविंद पाटील निलंगेकर निवडून आलेत. नागरी पतसंस्था गटातून आमदार रमेश कराड यांचे सूपूत्र ऋषिकेश कराड निवडून आले आहेत. इतर दोन ठिकाणच्या दोन जागा निवडून आल्या आहेत. या चार जागांच्या जोरावर संभाजी पाटील निलंगेकरही धीरज देशमुखांना जेरीस आणतील. पण देशमुखांनी आर्थिक नाड्या पुन्हा आपल्या हातात घेतल्या. त्यातून ते संभाजी पाटील निलंगेकरांच्या विरोधकांना ताकद देतील. या निवडणुकीतून देशमुख कुटुंबाने पुन्हा एकदा लातूरवर आपले वर्चस्व दाखवून दिले आहे.