संभाजीराव पाटील निलंगेकरांना लाल दिवा पक्का, निलंगा मतदारसंघ राहणार जिल्ह्याच्या केंद्रस्थानी

  • Written By: Published:
संभाजीराव पाटील निलंगेकरांना लाल दिवा पक्का, निलंगा मतदारसंघ राहणार जिल्ह्याच्या केंद्रस्थानी

निलंगा : विधानसभा निवडणुकीचा (Vidhansabha Election) अनुषंगाने उडालेली प्रचाराची धुळवड, आरोप-प्रत्यारोपांची राळ, विकास कामांची उजळणी, नेत्यांचे दौरे यामुळे संपूर्ण मतदारसंघ गेले काही दिवस ढवळून निघाला. या निमित्ताने जिल्ह्याच्या राजकारणात निलंगा मतदारसंघ पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला. दरम्यान, प्रचाराच्या सांगतेनंतर निलंगा मतदारसंघातील जनतेने निलंग्यात संभाजीराव पाटील निलंगेकरांना (Sambhajirao Patil Nilangekar) लाल दिवा पक्का, असा विश्वास व्यक्त केला.

मोठी बातमी! संभाजीराव पाटील निलंगेकर यांना राष्ट्रीय मराठा पार्टीचा जाहीर पाठिंबा 

निलंगा विधानसभा मतदारसंघात निवडणूक जाहीर होण्याच्या पूर्वीपासून खरंतर प्रचार सुरू झाला होता. तिकिटाची खात्री असल्याने माजी मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी प्रचाराला सुरुवातही केली होती. विरोधकांच्या उमेदवाराची घोषणा उमेदवारी अर्ज एक दिवस शिल्लक असताना झाली. त्यामुळे विरोधकांना तयारीसाठी फारसा वेळ मिळाला नाही. उमेदवाराची प्रतिमा आणि सुसंस्कृतपणा हा निलंगा मतदारसंघात या निवडणुकीत सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरला.

संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वातच सर्वांगीण विकास झाला, भारतबाई सोळुंके यांचं प्रतिपादन 

आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी मागील काळात केलेली विकासकामे, नागरिकांशी जपलेले नाते याचा मोठा प्रभाव मतदारांवर आहे. गावोगावच्या नागरिकांसोबत असणारे वैयक्तिक संबंध आणि विकास कामांच्या अनुषंगाने जोडला गेलेला मतदार या आ. निलंगेकर यांच्यासाठी जमेच्या बाजू ठरत आहेत.

आ.
निलंगेकर यांनी मागील १० वर्षात केलेल्या कामांचा लेखालोखा सादर केला. त्याचा अपेक्षित परिणाम दिसून येत आहे. विरोधकांकडे विकासाचे कसलेही मुद्दे नसताना त्यांनी मात्र अपप्रचारावर भर दिला. त्याला उत्तर म्हणून विकासकामे दाखवण्यात आली.

घरंदाज राजकारणी आणि पोरकट उमेदवार यांच्यात जनतेनेच तुलना केली. आ.
निलंगेकर यांनी कुठेही, कधीही पातळी सोडली नाही. खालच्या पातळीवर टीका केली नाही. याच्यातून त्यांचा सुसंस्कृतपणा दिसून आला.

मतदारसंघात देशपातळीवरील नेत्यांच्या सभा झाल्या. राज्यातील व केंद्रातील मंत्री मतदारसंघात आले. प्रत्येकाने आ.निलंगेकर यांच्या कामाचे कौतुकच केले. राज्यपातळीवर नेतृत्व करण्यास आ.संभाजीराव पाटील सक्षम असल्याचे आणि निलंग्याचा लाल दिवा पक्का असल्याचा विश्वास त्यांनी दिला.

आपल्या लोकप्रतिनिधीला मिळणारी ही शाबासकी निलंगेकर नागरिकांना सुखावून गेली. विशेषतः नितीन गडकरी यांनी केलेले भाषण निलंगेकरांची छाती अभिमानाने फुगवणारे ठरले. त्यामुळे प्रचाराची सांगता होत असताना निलंगेकर नागरिकांचा कौल कोणाकडे असेल ? हे स्पष्ट झाले. पुन्हा एकदा मंत्री होण्यासाठी आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनाच विजयी करण्याचा निर्धार जनतेने केला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube