विधानसभेचा निकाल मान्य नाही, ईव्हीएममुळेच महायुती जिंकली…; मनसे नेत्याचा गंभीर आरोप

  • Written By: Published:
विधानसभेचा निकाल मान्य नाही, ईव्हीएममुळेच महायुती जिंकली…; मनसे नेत्याचा गंभीर आरोप

Avinash Jadhav : विधानसभा निवडणुकी (Vidhansabha Election) महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळाले. भाजपने (BJP) 132 जागा जिंकल्या आहेत, तर शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने अनुक्रमे 56 आणि 40 जागा जिंकल्या. मात्र, मनसेने 128 उमेदवार उभे करून एकही उमेदवार निवडूण आला नाही. त्यावर आता मनसेचे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी आपली भूमिका जाहीर केली.

मोठी बातमी! डोंगरीत इमारतीला भीषण आग, अनेक लोक अडकले 

जाधव म्हणाले, विधानसभेचा निकाल आम्हाला मान्य नाही. कोविड काळात मनसैनिकांनी काम केलं. जे आमदार कोणाला भेटत नव्हते, कोणाच्या घरी जात नव्हते, ते आमदार लाखो मतांनी निवडून आले. मी खात्रीने सांगतो की, ईव्हीएमशिवाय ही गोष्ट अशक्य होती, असं ते म्हणाले.

पुढं ते म्हणाले की, एवढ्या मोठ्या यशानंतर इतर लोकांमध्येही आनंद नाही. अनेकांना प्रश्न पडलाय की आमचं मत गेलं कुठे? हे मत ईव्हीएमच्या घशात गेलंय. देशातील 140 कोटी जनतेला कळावं की, आपल्या देशात काहीतरी चुकीचं चाललंय. अमेरिकेसारख्या देशात बॅलटवर निवडणुका होत असतील तर इथं काय गरज आहे? हे आम्ही 2019 लाही म्हणत होतो. आता मी खात्रीने सांगतो की, आमची फसवणूक झाली आहे. न्यायालय त्यांचं, निवडणूक आयोग त्यांचा. आम्ही कोणाला विचारायचं? असा सवाल त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या जागांवर मला असं वाटतं की, सगळं सेट होतं, तर मनसे फक्त नावालाच होती, असंही ते म्हणाले.

Sonali Kulkarni : हिरव्या रंगाच्या साडीत सोनालीचं झक्कास फोटोशूट 

भाजपच्या विरोधात लाट आल्याचे दिसत होते. मात्र निकालानंतर हे सर्व खोटे असल्याचे सिद्ध झाले. त्यांनी फक्त एक पिक्चर तयार केला. लाडकी बहीण योजने आणली. त्यांना कारण पाहिजे होतं, ते कारण आणलं गेलं, असा दावा करत महायुतीने आमची फसवणूक केली, असंही जाधव म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube