टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानले गेले पाहिजे ; हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याने राजकारण पेटणार?
Harshwardhan Sapkal : मालेगाव महानगरपालिकेतील उपमहापौरच्या दालनात टिपू सुलतानाचा फोटो लावण्यात आल्याने राज्यातील राजकारणात
Harshwardhan Sapkal : मालेगाव महानगरपालिकेतील उपमहापौरच्या दालनात टिपू सुलतानाचा फोटो लावण्यात आल्याने राज्यातील राजकारणात नव्या वादाला तोंड फुटला आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरुन समाजवादी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर आता महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानले गेले पाहिजे असं वक्तव्य केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीच्या अनेक नेत्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य आणि स्वराज्य असा विचार दिला, अगदी त्याचप्रमाणे टिपू सुलताना यांनी त्याच समकक्ष काम केले आहे. त्यामुळे टिपू सुलतान यांना देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानले गेले पाहिजे असं माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
माध्यमांशी बोलताना सपकाळ (Harshwardhan Sapkal) म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचं शौर्य ज्याप्रकारचं आहे, त्यांनी जो स्वराज्याचा विचार दिला, त्याच मांदियाळीत, त्यांच्यानंतर बऱ्याच वर्षांनी टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्याविरोधात लढा पुकारला होता. त्या अर्थाने टिपू सुलतान हे र्शोर्य गाजवणारे युद्ध होऊ गेले, भारताचे भूमिपूत्र होऊन गेले, त्यांनी कधीही कोणत्याही विषारी, विखारी विचारांना जवळ केले नाही. त्यामुळे शौर्याचे लक्षण म्हणून आपण टिपू सुलतान (Tipu Sultan) यांच्याकडे शिवाजी महाराजांच्य समकक्ष पाहिले पाहिजे असं वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांशी बोलताना केलं. हर्षवर्धन सपकाळ यांच्या या वक्तव्यानंतर आता त्यांच्यावर चारही बाजूने महायुतीचे नेते जोरदार टीका करताना दिसत आहे.
मुलुंड अपघात प्रकरणात मृतांच्या वारसाला मिळणार 5 लाख; CM फडणवीसांची मोठी घोषणा
तर दुसरीकडे माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयात 50 हजाराची लाच घेतल्या प्रकरणी देखील भाष्य केले आहे. यावेळी ते म्हणाले की, नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयात 50 हजाराची लाच घेतली हे प्रकरण फार छोटं आहे. हे संपूर्ण सरकारच लाचखोर आहे. नरहरी झिरवळ यांच्यावर कारवाई तर व्हायलाच पाहिजे पण कोट्यावधी रुपये खाणारे देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे असं माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
