कोथरूड सुरोत्सवाचा खर्च 700 दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी, माथवड दाम्पत्याचा स्तुत्य उपक्रम
‘कोथरूड सुरोत्सव’ यंदा सामाजिक बांधिलकी जपत रद्द करण्याचा निर्णय नगरसेवक दिनेश माथवड आणि माजी नगरसेविका हर्षाली माथवड यांनी घेतला आहे.
Proceeds from Kothrud Surotsav to aid 700 drought-affected farming families : दिवाळीनिमित्त दरवर्षी कोथरूडकरांसाठी संगीताची मेजवानी ठरणारा ‘कोथरूड सुरोत्सव’ यंदा सामाजिक बांधिलकी जपत रद्द करण्याचा निर्णय नगरसेवक दिनेश माथवड आणि माजी नगरसेविका हर्षाली माथवड यांनी घेतला आहे. या कार्यक्रमासाठी नियोजित केलेला संपूर्ण खर्च महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी वापरण्यात येणार आहे.
खासदार तथा केंद्रीय मंत्री मा. मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांतर्गत 700 जीवनावश्यक वस्तूंच्या किट तयार करण्यात आल्या आहेत. या किट केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या असून, त्यांच्या माध्यमातून लवकरच गरजू शेतकरी कुटुंबांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत. दिवाळीच्या सणात या मदतीमुळे संकटग्रस्त कुटुंबांना दिलासा मिळणार आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी खळबळ! पालकमंत्री संजय शिरसाटांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न, तीन आरोपी अटकेत
नगरसेवक दिनेश माथवड म्हणाले, “कोथरूडकरांनी दरवर्षी सुरोत्सवाला भरभरून प्रतिसाद दिला आहे. यंदा या उत्सवाचा आनंद 700 शेतकरी कुटुंबांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. सामाजिक जबाबदारीला प्राधान्य देत हा निर्णय घेतला आहे.”
माजी नगरसेविका हर्षाली माथवड म्हणाल्या, “दिवाळी हा आनंद वाटण्याचा सण आहे. दुष्काळामुळे अडचणीत असलेल्या शेतकरी बांधवांच्या कुटुंबातही दिवाळीचा आनंद पोहोचावा, या भावनेतून हा उपक्रम राबवला आहे. गरजू कुटुंबांना मदतीचा हात देता येत आहे, हेच आमच्यासाठी खरे समाधान आहे.”