कर्नाटकातून आलेल्या गुटख्यावर LCB चा मोठा छापा ; 28 लाखांचा मुद्देमाल जप्त

Ahilyanagar LCB Raid : महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या सम्राट पानमसाला गुटख्याची कर्नाटकातून अहिल्यानगर जिल्ह्यात तस्करी होत असल्याचा प्रकार

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Ahilyanagar LCB Raid

Ahilyanagar LCB Raid : महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या सम्राट पानमसाला गुटख्याची कर्नाटकातून अहिल्यानगर जिल्ह्यात तस्करी होत असल्याचा प्रकार स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) धडक कारवाईत उघडकीस आला आहे. खर्डा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जातेगाव फाटा येथे पोलिसांनी सापळा रचून गुटख्याची वाहतूक करणारा आयशर टेम्पो पकडला. या कारवाईत गुटखा, सुगंधित तंबाखू आणि वाहनासह तब्बल २८ लाख ४ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून अन्य दोघे फरार आहेत. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की, खर्डा ते जामखेड मार्गावरून आयशर टेम्पो (क्रमांक MH-10-DT-0267) मधून प्रतिबंधित गुटख्याची विक्री करण्यासाठी वाहतूक केली जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी जातेगाव फाटा येथे पंचांसमक्ष सापळा रचला. संशयित टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सम्राट पानमसाला आणि सुगंधित तंबाखू आढळून आली.

जप्त मुद्देमालाचा तपशील

– सम्राट पानमसाला – १९ लाख ८८ हजार रुपये
– सुगंधित तंबाखू – १ लाख १६ हजार १६० रुपये
– आयशर टेम्पो – १५ लाख रुपये

अशा प्रकारे एकूण २८ लाख ४ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

कर्नाटकातील बिदरमधून गुटख्याचा पुरवठा!

प्राथमिक तपासात हा गुटखा कर्नाटक राज्यातील बिदर येथून विक्रीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या व्यवहाराशी संबंधित संतोषप्पा आणि रविंद्र शरणप्पा हे दोघे फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांचा शोध सुरू आहे. ताब्यात घेतलेला आरोपी आणि जप्त केलेला मुद्देमाल खर्डा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक १८२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३, २२३, २७४, २७५ आणि ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मस्कला पछाडत इतिहास रचण्याच्या तयारीत अँथ्रोपिक; जगातील सर्वात मोठी AI बोली जाहीर!

गुटखा तस्करीच्या साखळीचे धागेदोरे उघड होणार?

कर्नाटकातून महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करून विक्री करणाऱ्या साखळीवर या कारवाईमुळे मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या तस्करीमागे आणखी कोणाचे हात आहेत, गुटख्याचा पुरवठा कुठे केला जाणार होता आणि या व्यवहाराचे जाळे किती मोठे आहे, याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे. महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटख्याची तस्करी रोखण्यासाठी पोलिसांची ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

Letsupp दिवाळी अंक 2026 महाराष्ट्रात कुठेही मागवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

follow us