शरद पवारांच्या त्या पत्रानंतर सोनिया गांधी यांच्या डोळ्यात अश्रू, ‘बिलॉन्गिंग’मधून मोठा खुलासा
शरद पवार यांनी सोनिया गांधी यांच्या परदेशी जन्माचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेस नेतृत्वाला पत्र लिहिले होते.
Tears in Sonia Gandhi’s eyes following that letter from Sharad Pawar : काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांचे ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ हे पुस्तक मंगळवारी प्रकाशित झाले असून, या पुस्तकातून त्यांनी आपल्या राजकीय आणि वैयक्तिक आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घटनांवर पहिल्यांदाच भाष्य केले आहे. सात भागांमध्ये विभागलेल्या या पुस्तकातील एका प्रसंगाने आता विशेष लक्ष वेधले आहे. 1999 मध्ये शरद पवार यांनी सोनिया गांधी यांच्या परदेशी जन्माचा मुद्दा उपस्थित करत लिहिलेल्या पत्रामुळे सोनिया गांधी भावुक झाल्या होत्या. त्या पत्रानंतर काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत नेमकं काय घडलं? सोनिया गांधींच्या डोळ्यांत अश्रू का आले? त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय का घेतला आणि या सगळ्या घडामोडींनंतर शरद पवारांशी राजकीय समीकरणं कशी बदलली? या सगळ्या घटनांचा उल्लेख सोनिया गांधी यांनी आपल्या पुस्तकात केला आहे.
1999 मध्ये काँग्रेसमध्ये झालेल्या ऐतिहासिक राजकीय संघर्षाची आठवण पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शरद पवार यांनी सोनिया गांधी यांच्या परदेशी जन्माचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेस नेतृत्वाला पत्र लिहिले होते. या पत्रामुळे सोनिया गांधी यांना मोठा मानसिक धक्का बसला होता. या घटनेचा उल्लेख करताना सोनिया गांधी यांनी त्या काळातील प्रसंग, आपल्या भावना आणि त्यानंतर घडलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले आहे.
सोनिया गांधी यांनी सांगितल्यानुसार, मे 1999 मध्ये काँग्रेसच्या कार्यकारिणीतील म्हणजेच सीडब्लूसीमधील त्यांच्या तीन सहकाऱ्यांकडून त्यांना एक सविस्तर पत्र मिळाले. या पत्रात महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भूमिका सर्वाधिक ठळक होती. परदेशात जन्मलेली व्यक्ती भारतात सर्वोच्च पदावर राहू शकत नाही, असा मुद्दा या पत्रातून मांडण्यात आला होता. त्यानंतर काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत देखील हाच मुद्दा पुन्हा उपस्थित करण्यात आला.
Letsupp दिवाळी अंक २०२६ महाराष्ट्रात कुठेही मागवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
या चर्चेदरम्यान आपल्या डोळ्यांत अश्रू आले आणि आपण बैठक सोडून बाहेर पडलो, असे सोनिया गांधी यांनी सांगितले आहे. आपण पद किंवा सत्ता मिळवण्यासाठी राजकारणात प्रवेश केला नव्हता. उलट, काही काँग्रेस सहकाऱ्यांनीच आपल्याला राजकारणात येण्याचा आग्रह केला होता. मात्र, आता त्याच सहकाऱ्यांकडून आपल्या जन्माच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केले जात असल्याची भावना त्यांना वेदनादायी वाटली.
या घटनेनंतर सोनिया गांधी यांनी काँग्रेस कार्यकारिणीला राजीनामापत्र लिहिले. या पत्रात त्यांनी, आपल्या जन्म परदेशात झाला असला तरी भारताला आपण आपले घर म्हणून निवडले आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत आपण भारतीयच राहणार आहोत, अशी भूमिका मंडळी. पद भूषवण्याचा मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा नव्हता, मात्र देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असल्याने मनाला वेदना झाल्या, असे त्यांनी स्पष्ट केले.
सोनिया गांधी यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली. देशाच्या विविध भागांतून पावसाचे कार्यकर्ते त्यांच्या निवासस्थानाबाहेर जमा झाले. त्यांनी राजीनामा मागे घ्यावा, अशी विनन्ती कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. काही कार्यकर्ते भावुक होऊन रडले, तर काही ठिकाणी भावनिक गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. कार्यकर्त्यांचा दबाव आणि काँग्रेस कार्यकारिणीतील सर्व सदस्यांचा आग्रह यामुळे सोनिया गांधी यांना आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा लागला.
अखेर सत्तेसाठी एकच उमेदवार उरला… सोनिया गांधींबाबत कंगनाचं वादग्रस्त विधान, राजकीय चर्चांना उधाण
यावेळी त्यांनी स्वतःलाच एक महत्वाचा प्रश्न विचारला. आपण स्वीकारलेली जबाबदारी अधिक महत्वाची की आपल्या दुखावलेल्या भावना? पक्षप्रती असलेली निष्ठा महत्वाची की वैयक्तिक वेदना? या आत्मपरीक्षणानंतर त्यांनी पुन्हा काम सुरू ठेवण्यास सहमती दर्शवली. यानंतर काँग्रेस कार्यकारिणीने आखिल भारतीय काँग्रेस समितीचे म्हणजेच एआयसीसीचे अधिवेशन बोलावले. या अधिवेशनाला सुमारे 1 हजार 500 प्रतिनिधी उपस्थित होते. या अधिवेशनात शरद पवार यांच्यसह संबंधित तिन्ही नेत्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील संघर्ष पुढे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत देखील पाहायला मिळाला. दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात निवडणूक लढवली. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर समान राजकीय विरोधकांना पराभूत करायचे असेल, तर एकत्र येऊन काम करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले. एकेकाळी आपल्या विरोधात भूमिका घेणाऱ्या नेत्यांसोबत पुन्हा राजकीय सहकार्य करणे हा आपल्यासाठी कठीण निर्णय होता, असे सोनिया गांधी यांनी नमूद केले आहे. मात्र अखेर काँग्रेस आ इ राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले आणि महाराष्ट्रात आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर ही आघाडी पुढील काळात देखील टिकून राहिली.
या राजकीय संघर्षाच्या आठवणी सांगतानाच सोनिया गांधी यांनी काँग्रेसमधील आपल्या सुरूवातीच्या काळात मदत करणाऱ्या काही नेत्यांचा देखील विशेष उल्लेख केला आहे. देशभर विस्तारलेल्या मोठ्या पक्षाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी स्वीकारताना आपल्याला काहीशी भीती वाटत होती. राजकीय विचारांबाबत आपण ठाम असलो, तरी पक्षाच्या कामकाजाचा व्यापक अनुभव आणि जाणकार सहकाऱ्यांचा सल्ला आपल्यासाठी महत्वाचा ठरला, असे त्यांनी म्हटले आहे.
दादा, तुझ्याशिवायची ही पहिली दिवाळी… सुप्रिया सुळे भावूक, अजित पवारांसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा
यामध्ये मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अर्जुन सिंह यांचा त्यांनी विशेष उलेख केला. अर्जुन सिंह हे अत्यंत जाणकार आणि अनुभवी नेते होते. गुंतागुंतीच्या राजकीय विषयांवर चर्चा करताना ते प्रत्येकाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत असत. बैठकीतील चर्चेचा नेमका गाभा समजून घेतल्यानंतर आवश्यक तो मुद्दा मोजक्या शब्दांत स्पष्ट करण्याची त्यांची हातोटी होती, असे सोनिया गांधी यांनी सांगितले.
तसेच पश्चिम बंगालमधील काँग्रेसचे आक्रमक आणि सहकारी नेते प्रिया रंजन दासमुन्शी यांचा देखील त्यांनी उल्लेख केला आहे. पक्षातील अनेक नव्या सहकाऱ्यांशी ओळख होत असताना या नेत्यांनी आपल्याला सुरूवातीच्या काळात महत्वपूर्ण मदत केली, असे सोनिया गांधी यांनी आपल्या पुस्तकात नमूद केले आहे. एकूणच, 1999 मधील सोनिया गांधी यांच्या परदेशी जन्माच्या मुद्द्यावरून काँग्रेसमध्ये निर्माण झालेला संघर्ष, शरद पवार यांचे पत्र, सोनिया गांधी यांचा भावनिक राजीनामा, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना आणि पुढे महाराष्ट्रात आकाराला आलेली काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी, या सर्व राजकीय घडामोडींचा महत्वपूर्ण पट या पुस्तकातून समोर येतो.