त्रिभाषा धोरण समितीचा अहवाल राज्य सरकारकडे सादर; आता मंत्रिमंडळात होणार मोठा निर्णय?

Narendra Jadhav :  गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात चर्चेत असणारा भाषा सूत्रासंदर्भातील अहवाल सोमवारी राज्य सरकारकडे सादर

  • Written By: Published:
Narendra Jadhav

Narendra Jadhav :  गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात चर्चेत असणारा भाषा सूत्रासंदर्भातील अहवाल सोमवारी राज्य सरकारकडे सादर करण्यात आला असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव यांनी दिली आहे. याच बरोबर त्रिभाषा धोरण समितीने राज्य सरकारकडे शालेय शिक्षणात आर्टिफिशियल तंत्रज्ञानाची गरज हा पूरक अहवालही सादर केला असल्याची माहिती या समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव यांनी दिली आहे.

नेमकं प्रकरण काय?

काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता मात्र या निर्णयाला मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), मराठीप्रेमी नागरिक , साहित्यिक आणि लेखक यांनी जोरदार विरोध दर्शविल्याने राज्य सरकारने निर्णय मागे घेण्याची घोषणा केली होती. तसेच पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी असावी की नसावी याचा अभ्यास करण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव (Narendra Jadhav) यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली होती. आता या समितीने अहवाल सादर केला असून या अहवालावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार आहे.

या समितीने राज्यातील विविध विभागांना भेटी देत नागरिकांच्या सूचना, मते, टीका व अभिप्राय जाणून घेतले होते. या समितीला राज्य सरकारने अहवाल सादर करण्यासाठी दोन वेळा मुदतवाढ देखील दिली होती. अहवाल सादर करण्याची मुदत 6 फेब्रुवारीला संपल्यानंतर 9 फेब्रुवारीला रोजी समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव यांनी अहवाल राज्य सरकारकडे सादर केला आहे.

दीपिका पादुकोणच्या पोस्टवर रणवीर सिंगची “OHH MOMMA” कमेंट अन्… 

मी कुलगूरु होतो. त्यामुळे निकालाच्या आधी पेपर फोडता येत नाही हे लक्षात घ्या. अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द  केला आहे. आता तो मंत्रिमंड समितीसमोर चर्चेसाठी ठेवला जाईल अशी प्रतिक्रिया नरेंद्र जाधव यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. त्यामुळे आता राज्य सरकार या अहवालावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष  लागून आहे.

follow us