EVM हॅक करू, 54 कोटी लागतील, व्हायरल व्हिडिओवर EC कडून स्पष्टीकरण, गुन्हाही दाखल

  • Written By: Published:
EVM हॅक करू, 54 कोटी लागतील, व्हायरल व्हिडिओवर EC कडून स्पष्टीकरण, गुन्हाही दाखल

EVM Hacking : विधानसभा निवडणुकांच्या (Vidhansabha Election) निकालानंतर विरोधकांकडून ईव्हीएमवर शंका व्यक्त केली जातेय. त्यातच सोशल मीडियावर ईव्हीएम टॅम्परिंगचा (EVM Tampering) एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला. व्हिडिओतील व्यक्ती ईव्हीएम मशिन हॅक करुन एका राजकीय पक्षाच्या बाजुने निवडणुकांचा निकाल फिरवू, असा दावा करतोय. यामुळं लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, आता या व्हिडिओवनिवडणूक आयोगाने (Election Commission) स्पष्टीकरणं दिलं. तसेच याप्रकरणी मुंबईच्या सायबर पोलिसांनी (Mumbai Cyber ​​Police) गुन्हा दाखल केल्याचेही सांगितले आहे.

बांग्लादेशात आणखी 2 हिंदू संतांना अटक, चिन्मय दासचे सचिवही बेपत्ता; इस्कॉन कोलकाता प्रवक्त्याचा मोठा दावा 

या व्हायरल व्हिडिओत हॅकरने दावा केला आहे की तो अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून ईव्हीएम हॅक करू शकतो. यासाठी त्याने 54 कोटी रुपयांची मागणी केल्याचं व्हिडिओत ऐकायला मिळत आहे.

दोन व्यक्तीमधील या संभाषणात 105 पैकी 63 उमेदवारांना जिंकवून देण्याबाबत चर्चा होत आहे. कथित हॅकरचे म्हणणे आहे की उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आम्हाला व्हीव्हीपीएटी मशीन क्रमांक आवश्यक असेल. तसेच 288 मतदारसंघापैकी 281 ठिकाणी हाय-स्पीड इंटरनेट कनेक्शन आणि फिल्डवर काही माणसे लागतील, असं हॅकर सांगतो.

दरम्यान, यावर आता महाराष्ट्र निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे. व्हिडिओमध्ये केलेले दावे निराधार, खोटे आणि अप्रमाणित आहेत. या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीविरोधात मुंबई सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. निवडणूक आयोगाने असेही म्हटले आहे की ईव्हीएम हे टॅंपरप्रुफ आहे, नेटवर्कसोबत ती जोडली जाऊ शकत नाही, असंही आयोगाने म्हटलं.

व्हिडिओतील व्यक्तीविरुद्ध गुन्हा

दरम्यान, ईव्हीएम हॅकिंगचा दावा करणाऱ्या हॅकरविरुध्द भारतीय न्यायिक संहिता 2023 च्या कलम 318/4 अन्वये आयटी कायदा 2000 च्या कलम 43(ग) आणि कलम 66(घ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच, ईव्हीडएम टॅंपरप्रुफ आहे, नेटवर्कसोबत ती जोडली जाऊ शकत नाही, असंही आयोगाने सांगितलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube