बांग्लादेशात आणखी 2 हिंदू संतांना अटक, चिन्मय दासचे सचिवही बेपत्ता; इस्कॉन कोलकाता प्रवक्त्याचा मोठा दावा

बांग्लादेशात आणखी 2 हिंदू संतांना अटक, चिन्मय दासचे सचिवही बेपत्ता; इस्कॉन कोलकाता प्रवक्त्याचा मोठा दावा

Two More Hindu Saints Arrested In Bangladesh : बांग्लादेशात चिन्मय कृष्ण दास यांच्यानंतर आणखी दोन हिंदू धर्मगुरूंना (Hindu Saints) अटक करण्यात आलीय.  इस्कॉन कोलकाता प्रवक्ते राधारमण दास यांनी शनिवारी हा दावा केलाय. राधारमण म्हणाले की, “मला माहिती मिळाली आहे की, बांगलादेशातील पोलिसांनी आणखी दोन इस्कॉन संतांना अटक केली आहे. शुक्रवारी रात्री सोशल मिडिया X अकाउंट पोस्टमध्ये राधारमण यांनी (Bangladesh News) लिहिलंय की, चिन्मय प्रभु यांच्यासाठी दोन भक्तांना मंदिरात घेवून जाताना अटक करण्यात आली आहे. चिन्मय प्रभु यांचे सचिव देखील बेपत्ता आहेत, त्यांच्यासाठी प्रार्थना करा, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

याआधी शुक्रवारी, राधारमणच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं की, श्याम दास प्रभू या आणखी एका धर्मगुरूला आज चटगाव पोलिसांनी अटक केली. राधारमणने शनिवारी इंस्टाग्रामवर पोस्ट केली की, तो दहशतवादी दिसतो का? निष्पाप इस्कॉन ब्रह्मचारींची अटक अत्यंत धक्कादायक आणि अस्वस्थ करणारी असल्याचं राधारमण यांनी म्हटलंय.

आतापर्यंत तीन हिंदू संतांना अटक करण्यात आली आहे. चिन्मय दासला गेल्या सोमवारी ढाका येथील हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली होती. यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. तेथून न्यायालयाने त्याची रवानगी कारागृहात केली आहे. चिन्मय हा बांगलादेशमध्ये स्थापन झालेल्या सनातनी जागरण जोटचा प्रवक्ता आहे. चिन्मयच्या अटकेपासून बांग्लादेशात तीन हिंदू संतांना अटक करण्यात आलीय.

‘उद्धव ठाकरे सोबत असते तर…’; सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असताना भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य

बांग्लादेशात फक्त 8 टक्के हिंदू आहेत. 1971 साली बांगलादेश हा स्वतंत्र देश झाला. त्यावेळी हिंदूंची लोकसंख्या 22 टक्के होती. मात्र गेल्या पाच दशकांहून अधिक काळ हिंदूंवरील वाढत्या अत्याचारामुळे लोकसंख्या झपाट्याने कमी झाली. सध्या बांगलादेशात हिंदूंची लोकसंख्या केवळ 8 टक्के आहे. 5 ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनामुळे शेख हसीना यांना बांग्लादेश सोडावे लागले होते. तेव्हापासून तेथील हिंदूंवर हिंसाचार सुरू आहे.

काँग्रेसनंतर केजरीवालांचाही डाव, दिल्ली निवडणुकीत आघाडी नाहीच; स्वबळावर लढणार

दरम्यान, बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करणे ही केंद्राची जबाबदारी असल्याचे तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक बॅनर्जी यांनी शुक्रवारी म्हटलंय. डायमंड हार्बरचे खासदार अभिषेक म्हणाले की, “बांगलादेशच्या प्रश्नात पश्चिम बंगालची कोणतीही भूमिका नाही. मी स्पष्ट केलंय की, तुम्हाला देशाच्या संविधानाचे पालन करावे लागेल. बांग्लादेशसोबत हा प्रश्न सोडवण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे.”

चिन्मय दासच्या तात्काळ सुटकेच्या मागणीसाठी कोलकाता येथे भाजपच्या निषेधावर अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, बांगलादेशात जे काही चाललंय, तो राजकीय मुद्दा नाही. भाजपसाठी सर्व काही राजकारण आहे. जर त्यांचे सरकार असेल तर सत्तेत असताना भाजप नेते दिल्लीत जाऊन आंदोलन का करत नाहीत? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube