Bangladesh : धक्कादायक! हॉटेलच्या आगीत 8 होरपळले; हिंसक जमावाच्या मदतीने 500 कैदी पळाले

Bangladesh : धक्कादायक! हॉटेलच्या आगीत 8 होरपळले; हिंसक जमावाच्या मदतीने 500 कैदी पळाले

Bangladesh Crisis : बांग्लादेशात हिंसाचाराने रोद्ररूप धारण केलं आहे. (Bangladesh Crisis ) अनेकांची घर पेटून दिली जात आहेत. या उन्मादी जमावाने देशातील हॉटेल्स, अवामी लीग पक्षाची कार्यालये यांना आग लावण्याचा सपाटाच लावला आहे. जेसोर जिल्ह्यातील एका हॉटेलला आग लावण्यात आली. यामध्ये आठ लोकांचा होरपळून मृत्यू झाला. तर 84 लोक जखमी झाले आहेत. आग लावण्यात आलेल्या हॉटेलचा मालक अवामी लीगचा नेता शाहीन चकलादार आहे. शेरपूर जिल्ह्यातील एका जेलमध्ये प्रदर्शनकारी घुसले आणि जवळपास पाचशे कैद्यांना जेलमधून पळून जाण्यास त्यांनी मदत केली.

बांग्लादेशला झटका! टी 20 वर्ल्डकप होणार शिफ्ट?, ICC ने केली तयारी

बांग्लादेशात हिंसाचाराने रोद्ररूप धारण केलं आहे. (Bangladesh ) अनेकांची घर पेटवून दिली जात आहेत. त्यामध्ये आता समोर आलेल्या बातमीनुसार बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मश्रफी मुर्तझा याच्या घराला आंदोलकांनी आग लावली. देशात सध्या सुरू असलेल्या अराजकतेच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि सुरक्षा दलांकडून विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन गोळ्या घातल्या जात आहेत. तरी देखील येथील परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. लष्कराने देशाचा ताबा घेतला आहे. मात्र या लष्करालाही शांतता प्रस्थापित करता आलेली नाही. या हिंसाचाराचा सर्वाधिक फटका बांग्लादेशातील लहान मुले आणि महिलांना बसत आहे.

देशभरात कर्फ्यू लावण्यात आला आहे. तरीदेखील सोमवारी स्थानिक जमावाने हातात लाठ्या काठ्या आणि हत्यारे घेत रॅली काढली होती. याच दरम्यान या जमावाने दमदमा कालीगंज भागातील जिल्हा कारागृहावर हल्ला केला. कारागृहाचे गेट तोडले आणि आग लावून टाकली. शेरपूरा जिल्हा कारागृहातील जवळपास पाचशे कैद्यांना पळून जाण्यास मदत केली. सध्याच्या परिस्थितीत देशातील परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली असून सर्वसामान्य नागरिक आणि येथील अल्पसंख्यक हिंदू समाज प्रचंड दहशतीत आहे.

बांग्लादेशचा ताबा लष्कराच्या हाती, पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा, देश सोडला

क्रिकेटर खासदार मुतर्झाच्या घराला आग

जमावाने अवामी लीगचे खासदार काजी नबील यांच्या घरात घुसून तोडफोड केली आणि घराला आग लावली. तसेच बांग्लादेश क्रिकेट संघातील आघाडीचा फलंदाज लिटन दास आणि माजी कर्णधाक मश्रफी मुर्तझा यांच्या घरांना आग लावली. मुर्तझा अवामी लीगचे नेते आहेत. मुर्तझाने जानेवारी महिन्यात अवामी लीगच्या तिकीटावर निवडणूक लढली होती. सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर डेली न्यूजपेपर या बांग्लादेशी वृत्तपत्राने क्रिकेटर लिटन दास याचं घर जाळल्याचं वृत्त फक्त एक अफवा असल्याचे सांगितले. यात काहीच तथ्य नाही. हिंसक जमावाने लिटन दासचं घर पेटवल्याच्या बातम्या आल्या होत्या.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube