बांग्लादेशला झटका! टी 20 वर्ल्डकप होणार शिफ्ट?, ICC ने केली तयारी

बांग्लादेशला झटका! टी 20 वर्ल्डकप होणार शिफ्ट?, ICC ने केली तयारी

Bangladesh News : भारता शेजारील बांग्लादेशातील परिस्थिती (Bangladesh News) अतिशय चिंताजनक आहे. देशातील अराजकता आणि हिंसाचारामुळे पंतप्रधान शेख हसीना (Shaikh Hasina) यांनी राजीनामा देऊन देश सोडला आहे. सैन्याने देशाचा ताबा (Bangladesh Army) घेतला आहे. प्रदर्शनकारी रस्त्यांवर फिरत आहेत. अशी भयावह परिस्थिती असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. बांग्लादेशात या वर्षातील ऑक्टोबर महिन्यात महिला टी 20 विश्वचषक (Women’s T20 World Cup) स्पर्धा होणार आहेत. मात्र आता या स्पर्धा होतील की नाही अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

आयसीसी बांग्लादेशातील (ICC) परिस्थितीवर अत्यंत बारकाईने नजर ठेऊन आहे. स्पर्धा सुरू होण्यासाठी अजून दोन महिने शिल्लक आहेत. अशात या स्पर्धा अन्य ठिकाणी आयोजित होतील अशी चिन्हे दिसू लागली आहेत. आयसीसीने सांगितले की सध्या आम्ही बांग्लादेशातील परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाबरोबर चर्चा (Bangladesh Cricket Board) करत आहोत. आयसीसीच्या प्रवक्त्याने आयएएनएस वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की आयसीसी, बांग्लादेश क्रिकेट बोर्डाच्या सुरक्षा एजन्सी आणि आमचे सुरक्षा सल्लागार असे आम्ही सगळेच बांग्लादेशातील परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. सुरक्षितता आणि या स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व लोकांची सुरक्षा या गोष्टी आमच्यासाठी सर्वाधिक महत्त्वाच्या आहेत.

बांग्लादेशचा ताबा लष्कराच्या हाती, पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा, देश सोडला

मागील महिन्यात श्रीलंकेची राजधानी कोलंबो (Sri Lanka) शहरात पर पडलेल्या आयसीसीच्या वार्षिक बैठकीत बांग्लादेशातील परस्थितीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. परंतु हा मुद्दा या बैठकीच्या अजेंड्यात नव्हता. बांग्लादेशात सध्या तीव्र आंदोलन सुरू आहे. महिला टी 20 वर्ल्डकप मध्ये एकूण 23 सामने होणार आहे. ही स्पर्धा अठरा दिवस चालणार आहे. ढाका शहरातील शेर ए बांगला स्टेडियम आणि सिलहटमधील सिलहट स्टेडियमवर सर्व सामने होणार आहेत. परंतु देशातील सध्याची परिस्थिती पाहता आता बांग्लादेशात टी 20 वर्ल्डकप होईल याची शक्यता कमी वाटू लागली आहे.

माजी कर्णधाराचं घरच पेटवलं

बांग्लादेशात हिंसाचाराने रोद्ररूप धारण केलं आहे. (Bangladesh ) अनेकांची घर पेटवून दिली जात आहेत. त्यामध्ये आता समोर आलेल्या बातमीनुसार बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मश्रफी मुर्तझा याच्या घराला आंदोलकांनी आग लावली. देशात सध्या सुरू असलेल्या अराजकतेच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि सुरक्षा दलांकडून विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन गोळ्या घातल्या जात आहेत.

बांग्लादेशात पुन्हा आंदोलन! सोशल मीडिया बंद, विद्यार्थी उतरले रस्त्यांवर; तणावात वाढ

follow us
  • fb
  • instagram
  • youtube