कोण आहेत लष्करप्रमुख जनरल वकार? शेख हसीना यांच्यानंतर स्वीकारणार बांगलादेशची जबाबदारी…
General Waker Uz Zaman : गेल्या महिन्याभरापासून बांगलादेश (Bangladesh) मोठ्या प्रमाणात हिंचासार सुरु आहे. वाढत्या हिंसाचारामुळे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (PM Sheikh Hasina) यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यांना बांगलादेशही सोडावा लागला. आता लष्कराने बांगलादेशचे नेतृत्व हाती घेतले. बांगलादेशची सत्ता लष्कराने ताब्यात घेतल्यानंतर बांगलादेशचे लष्करप्रमुख जनरल वकार उज जमा यांचे नाव चर्चेत आलं.
‘त्यांना आरक्षणातलं काय कळतंय?’, मनोज जरांगेंची राज ठाकरेंवर टीका
वकार यांनी केलं शांतता राखण्याचं आवाहन
बांगलादेशातील नाट्यमय राजकीय बदलांनंतर देशाचे लष्करप्रमुख जनरल वकार उज जमा हे सर्वात प्रमुख व्यक्ती म्हणून उदयास आले. त्यांच्या अल्टिमेटमनंतरच शेख हसीना यांना देश सोडावा लागल्याचे मानलं जातंय. शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर जनरल वकार यांनी आपल्या भाषणात संयम राखण्याचं जनेतला आवाहन केलं. वकार यांनी जनतेशी केलेल्या संबोधनात ते देशाच्या नेत्याप्रमाणे बोलताना दिसले. सध्या संपूर्ण जगाचे लक्ष लष्करप्रमुखांवर लागून आहे.
जनरल वकार यांची एक शिस्तप्रिय अधिकारी अशी प्रतिमा आहे. बांगलादेश लष्कराचे सर्वोच्च अधिकारी या नात्याने, देशाच्या स्थैर्याचे रक्षण करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांचा वकार यांचा जन्म16 सप्टेंबर 1966 रोजी बांगलादेशातील शेरपूर जिल्ह्यात झाला.
1985 मध्ये सैन्यात भरती
जनरल वकार 20 डिसेंबर 1985 रोजी बांगलादेश सैन्यात दाखल झाले. बांग्लादेश मिलिटरी अकादमीमध्ये 13 व्या बीएमए लाँग कोर्समधून पदवी घेतली. याशिवाय, याशिवाय त्यांनी लंडनच्या किंग्ज कॉलेजमधून शिक्षण घेतले होते. त्यांनी डिफेन्स स्टडीजमध्ये एमए केले आहे.
वकार हे बांगलादेश आर्मीमध्ये 4-स्टार जनरल आहेत. 23 जून 2024 पासून ते चीफ ऑफ आर्मी स्टाफ आहेत. हे पद स्वीकारण्यापूर्वी ते बांगलादेश लष्करात चीफ ऑफ जनरल स्टाफ होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जनरल वकार उज जमा यांच्या पत्नीचे नाव साराहनाज कामालिका रहमान आहे. त्या बांगलादेशचे माजी लष्करप्रमुख जनरल मुस्तफिजुर रहमान यांच्या कन्या आहेत. जनरल मुस्तफिजुर रहमान हे शेख हसीना यांचे काका लागतात. या नात्याने साराहनाज कमलिका रहमान ह्या त्यांच्या चुलत बहीण आहेत. तर त्यांचे पती जनरल वकार हे शेख हसीनाचे यांचे भावोजी आहेत.