बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा, अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा, अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू

PM Sheikh Hasina : गेल्या काही महिन्यांपासून बांग्लादेशात आरक्षणाच्या मुद्यावरून हिंसाचार सुरू आहे. यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

न्यूज एजन्सी एएफपीच्या वृत्तानुसार बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (PM Sheikh Hasina) यांनी राजीनामा दिला आहे. माहितीनुसार, शेख हसीना आपल्या बहिणीसह पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान ‘गणभवन’ सोडून सुरक्षित ठिकाणी गेल्या आहेत.

तर दुसरीकडे पंतप्रधान हसीना लष्करी हेलिकॉप्टरने भारताकडे रवाना झाल्या आहेत अशी माहिती रॉयटर्सने दिली आहे. सध्या संपूर्ण बांगलादेशात मोबाईल सेवा बंद पडली आहे. अशी देखील माहिती समोर आली आहे.

एका बांगलादेशी वृत्तपत्राने वृत्त दिले आहे की शेख हसीना लष्करी हेलिकॉप्टरने भारताकडे रवाना झाल्या आहेत. शेख हसीना सध्या भारतात आश्रय घेऊ शकतात अशी देखील माहिती या वृत्तपत्राने दिली आहे. याशिवाय देशाची कमान लष्कराच्या हाती जाऊ शकते. अशी देखील सध्या चर्चा आहे.

परमवीर सिंह अन् फडणवीसांमध्ये डील? देवेंद्र फडणवीसांनी एकाच वाक्यात विषय संपवला

बांगलादेशचे कायदा मंत्री अनिसुल हक म्हणाले, ‘तुम्ही बघताय काय परिस्थिती निर्माण होत आहे. सध्याची परिस्थिती खूपच वाईट आहे. मला काय होईल हे देखील माहित नाही. असं बांगलादेशचे कायदा मंत्री अनिसुल हक म्हणाले.

बांगलादेशात अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू

बांगलादेशात उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत 14 पोलिसांसह सुमारे 300 जणांचा मृत्यू झाला आहे तर आतापर्यंत हजारो लोक जखमी झाले आहे. सध्या बांगलादेशात परिस्थिती खूपच बिकट झाल्याने संपूर्ण देशात अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube