विश्वविजेत्या भारतीय संघासाठी BCCI ने उघडला खजिना; मिळणार रोहित ब्रिगेडपेक्षा 6 कोटी जास्त

BCCI Prize Money  : भारतीय संघाने शानदार कामगिरी करत अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी20 विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात

BCCI Prize Money

BCCI Prize Money  : भारतीय संघाने शानदार कामगिरी करत अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी20 विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करत इतिहास रचला आहे. ही स्पर्धा तिसऱ्यांदा जिंकणारा भारतीय संघ पहिला संघ ठरला आहे. तर मायदेशात ही स्पर्धा आणि सलग दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकणारा भारतीय संघ पहिला संघ ठरला आहे.

भारतीय संघाच्या (Team India) या शानदार कामगिरीनंतर आता बीसीसीआयने देखील मोठी घोषणा करत भारतीय खेळाडूंना मालामाल करण्याची घोषणा केली आहे. बीसीसीआयने मंगळवारी एका निवेदनात म्हटले आहे की, “या ऐतिहासिक कामगिरीबद्दल बोर्ड पुन्हा एकदा खेळाडू, सहाय्यक कर्मचारी आणि निवडकर्त्यांचे अभिनंदन करतो आणि भविष्यात त्यांना यश मिळावे अशी शुभेच्छा देतो.”

सचिव देवजित सैकिया म्हणाले, भारताच्या ऐतिहासिक टी20 विश्वचषक विजयानंतर, बीसीसीआय संघाला 131 कोटींचे रोख बक्षीस जाहीर करत आहे. बक्षीस रक्कम 6 कोटी जास्त बीसीसीआयने (BCCI) मागील टी20 विश्वचषक विजेत्या संघापेक्षा सूर्या ब्रिगेडसाठी खूप मोठे रोख बक्षीस जाहीर केले आहे. 2024 मध्ये, रोहितच्या नेतृत्वाखाली टी20 विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना 125 कोटी देण्यात आले होते. यावेळी, ही रक्कम 6 कोटींनी वाढवण्यात आली आहे. याचा अर्थ सूर्याच्या नेतृत्वाखाली टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला आणि सहाय्यक संघाला 131 कोटी देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर बक्षीस जाहीर

बीसीसीआयने 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय संघालाही बक्षीस दिले होते. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली, संघाने न्यूझीलंडला हरवून अंतिम सामना जिंकला होता. त्यानंतर बीसीसीआयने विजेत्या भारतीय संघाला 58 कोटी बक्षिसे दिली होती. भारताने ऐतिहासिक विजय नोंदवला.

भाजपची ‘पॉलिटिकल ड्रायक्लिनिंग’ की गुन्हेगारांचे अभयदान? अंबादास दानवे भडकले; कारण काय?-

सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली, भारतीय संघाने अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला 96 धावांनी हरवून इतिहास रचला. भारतीय संघ टी-20 विश्वचषक इतिहासात तीन वेळा ट्रॉफी जिंकणारा पहिला संघ ठरला. यजमान राष्ट्र म्हणून विजेतेपद जिंकणारा आणि त्याचे रक्षण करणारा तो पहिला संघही ठरला आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहला मॅन ऑफ द मॅच  पुरस्कार देण्यात आले आहे. तर संजू सॅमसनला मॅन ऑफ द सिरीज म्हणून निवड करण्यात आली आहे.

follow us