IND vs NEP : भारतीय संघ करणार नेपाळचा दौरा; खेळणार तीन टी20 सामने

IND vs NEP : भारतीय अ संघ नेपाळचा दौरा करणार असल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे. या दौऱ्यात भारतीय अ संघ तीन

IND Vs NEP

IND vs NEP : भारतीय अ संघ नेपाळचा दौरा करणार असल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे. या दौऱ्यात भारतीय अ संघ तीन टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेची सुरुवात 9 डिसेंबरपासून सुरु होणार असून शेवटचा सामना 13 डिसेंबर रोजी होणार आहे. तिन्ही सामने  र्तिपूर येथील त्रिभुवन युनिव्हर्सिटी इंटरनॅशनल क्रिकेट ग्राउंडवर खेळवले जातील. आयसीसीच्या (ICC) वार्षिक परिषदेदरम्यान ‘बीसीसीआय’ (BCCI) आणि ‘क्रिकेट असोसिएशन ऑफ नेपाळ’ (CAN) यांच्यातील अधिकाऱ्यांच्या चर्चेनंतर या मालिकेवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

वेळापत्रकानुसार, पहिला टी20 सामना 9 डिसेंबरला खेळवला जाईल, तर दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे 11 आणि 13 डिसेंबरला होईल. भारत ‘अ’ संघात आयपीएलमध्ये (IPL) उत्कृष्ट कामगिरी करणारे खेळाडू आणि वरिष्ठ भारतीय टी20 संघाबाहेरील खेळाडूंचा समावेश असण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेपाळला एका तगड्या संघाविरुद्ध खेळण्याची संधी मिळेल.

बीसीसीआयचा नेपाळला पाठिंबा

गेल्या वर्षीच्या टी20 विश्वचषक पात्रता फेरीपूर्वी, नेपाळने बंगळुरू येथील बीसीसीआयच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. तसेच, 2024 च्या टी20 विश्वचषकापूर्वी संघाने गुजरात आणि बडोदा या देशांतर्गत संघांविरुद्ध सराव सामने खेळले आणि त्यानंतर ‘क्रिकेट विश्वचषक लीग 2’ च्या सामन्यांच्या तयारीसाठी पुन्हा ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये परतले.

ऑपरेशन टायगर 3, ठाकरेंना पुन्हा धक्का; 10 आमदार सोडणार साथ?

9 ते 13 डिसेंबर या कालावधीत भारतीय वरिष्ठ संघाचा कोणताही सामना नियोजित नाही. त्यामुळे, या मालिकेत वैभव सूर्यवंशी आणि तिलक वर्मा यांच्यासारख्या खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे.

follow us