Hardik Pandya : हार्दिकनंतर मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार कोण? रोहित शर्मासह स्टार खेळाडू चर्चेत

Hardik Pandya :  आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियन्सने मोठा निर्णय घेत संघाचा कर्णधार आणि स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला संघातून

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Hardik Pandya

Hardik Pandya :  आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियन्सने मोठा निर्णय घेत संघाचा कर्णधार आणि स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला संघातून बाहेरचा रास्ता दाखवला आहे. 2027 मध्ये हार्दिक पंजाबकडून खेळताना दिसणार आहे. त्यामुळे 2027  मध्ये मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार कोण? याबाबत सध्या सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले आहे. भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा कर्णधार होणार असल्याची चर्चा सुरु आहे मात्र समोर आलेल्या माहितीनुसार, या शर्यतीत रोहित शर्मासह दोन स्टार खेळाडूंची नावे सध्या आघाडीवर आहे.

आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे. 2024 मध्ये रोहितकडून हार्दिकने (Hardik Pandya) कर्णधार पद घेतले होते तेव्हा चाहत्यांनी याचा जोरदार विरोध केला होता. त्यामुळे पुन्हा एकदा रोहित शर्मा मुंबईचा कर्णधार होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रोहितने भारताला टी20 विश्वचषक आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजय मिळवून दिला आहे. मुंबई इंडियन्सचे नवीन मुख्य प्रशिक्षक कायरन पोलार्ड आणि रोहित शर्मा यांनी आयपीएलमध्ये दीर्घकाळ एकत्र खेळले आहे त्यामुळे देखील रोहित शर्मा कर्णधार होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

ज्या रंगाचा चष्मा, त्या रंगाचेच जग दिसते…सोनिया गांधींच्या पुस्तकावर हजारेंचे वक्तव्य-

तर दुसरीकडे युवा फलंदाज तिलक वर्माच्या नावाचाही मुंबई इंडियन्सचे कर्णधार म्हणून विचार  करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे.  तिलक वर्मा  सध्या भारतीय टी20 संघाचा उपकर्णधार आहे. 24 वर्षीय तिलक वर्माने 2022 मध्ये मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि गेल्या काही वर्षांत टी20 क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तर आता आगामी 50 षटकांच्या ‘एसीसी रायझिंग स्टार्स आशिया कप’मध्येही तो संघाचे नेतृत्व करणार आहे. हे जाणून घ्या की,  एका ‘ट्रेड’ करारांतर्गत, मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला पंजाब किंग्स (PBKS) कडे पाठवले आहे, तर त्या बदल्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला आपल्या संघात सामील करून घेतले आहे.

Letsupp दिवाळी अंक 2026 महाराष्ट्रात कुठेही मागवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

follow us