Chennai Super Kings : CSK च्या मेंटॉरपदी नियुक्ती धोनी; चेन्नई सुपर किंग्सची घोषणा
Chennai Super Kings : आयपीएल 2027 पूर्वी चेन्नई सुपर किंग्सने मोठी घोषणा करत भारतीय संघाचा स्टार आणि माजी कर्णधार एमएस धोनीची
Chennai Super Kings : आयपीएल 2027 पूर्वी चेन्नई सुपर किंग्सने मोठी घोषणा करत भारतीय संघाचा स्टार आणि माजी कर्णधार एमएस धोनीची मेंटॉरपदी नियुक्ती केली आहे. धोनी गेल्या अनेक वर्षांपासून चेन्नईसोबत असून आता तो नवीन भूमिकेत दिसणार आहे. आयपीएल 2027 मध्ये देखील धोनी खेळाडू म्हणून चेन्नईकडून खेळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र आता सीएसकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, धोनीची संघाच्या मेंटॉरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे तो आता सीएसकेकडून खेळताना आयपीएल 2027 मध्ये दिसणार नाही. तर आता तो चेन्नई सुपर किंग्सच्या खेळाडूंना मार्गदर्शन करणार आहे.
From the heart of Mrs. Rupa Gurunath – Owner, Chennai Super Kings
Read More : https://t.co/AFjZ5yiuN4 https://t.co/Dncjo7kGDa
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) November 17, 2026
धोनीने सीएसकेकडून (CSK) आतापर्यंत 241 आयपीएल सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने 5,439 धावा केल्या असून आहे. तर संघाला पाच वेळा आयपीएल चॅम्पियन बनवण्यात त्याची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.धोनीने 2010, 2011, 2018, 2021 आणि 2023 मध्ये सीएसकेकडून पाच आयपीएल विजेतेपदे मिळवली आहे.
तर दुसरीकडे सनरायझर्स हैदराबादला (SRH) मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू ट्रॅव्हिस हेडने आयपीएल 2027 मधून माघार घेतली आहे. पुढील वर्षी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकामुळे हेडने वर्कलोड मॅनेजमेंट करण्यासाठी हा मोठा निर्णय घेतला आहे. हेडने घेतलेल्या या निर्णयामुळे आता आयपीएल 2027 मध्ये अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेडची जोडी दिसणार नाही.
राज्य मंत्रिमंडळाचे 4 मोठे निर्णय; सार्वजनिक विद्यापीठ कायद्यात सुधारणा होणार-
‘क्रिकइन्फो’ ने दिलेल्या माहितीनुसार, ट्रॅव्हिस हेडने संघ व्यवस्थापनाला कळवले आहे की तो आगामी हंगामात उपलब्ध नसेल. अहवालानुसार, आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकामुळे (वर्कलोड) व्यवस्थापित करण्याच्या उद्देशाने हेडने हा निर्णय घेतला आहे.