महेंद्र सिंह धोनीच्या आयपीएल 2026 खेळणार का?, सीएसके सीईओंनी केली मोठी घोषणा

गेल्या काही वर्षांपासून महेंद्र सिंह धोनीचा आयपीएलमधील सहभाग हा हंगामापूर्वी वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे.

  • Written By: Published:
News Photo   2025 11 07T211158.665

आयपीएल 2025 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सची कामगिरी सुमार राहिली. (Dhoni) ऋतुराज गायकवाड दुखापतग्रस्त झाल्यानंतर संघाची धुरा पुन्हा महेंद्रसिंह धोनीकडे आली. पण संघाला सर्वात शेवटच्या स्थानावर समाधान मानावं लागलं. त्यामुळे महेंद्रसिंह धोनी आयपीएल 2026 स्पर्धेत खेळेल की नाही याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.

सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी आता या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलं की की, महेंद्रसिंह धोनी पुढील हंगामात नक्कीच खेळेल.सीईओ कासी विश्वनाथन यांनी क्रिकबझला सांगितले की, “एमएसने आम्हाला सांगितले आहे की तो पुढील हंगामासाठी उपलब्ध असेल.

आता कॅप्टन कूल फक्त धोनीच! ट्रेडमार्कसाठी एमएस धोनीचा अर्ज दाखल

गेल्या काही वर्षांपासून महेंद्र सिंह धोनीचा आयपीएलमधील सहभाग हा हंगामापूर्वी वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे. पण सीएसकेच्या सीईओंच्या स्पष्टीकरणानंतर आयपीएल 2026 स्पर्धेत खेळणार हे निश्चित झालं आहे.सुपर किंग्सचा संघ दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आला होता.

तेव्हा धोनी दोन हंगाम वगळता सर्व हंगामात सीएसकेसोबत आहे. या पर्वात खेळणार हे निश्चित झाल्यानंतर फ्रँचायझीसाठी 17वा आणि आयपीएलमधील एकूण 19वा हंगाम असेल. महेंद्रसिंह धोनी 2008 पासून आयपीएलचा भाग आहे. त्याने सीएसकेसाठी 248 सामन्यांमध्ये 4865 धावा केल्या आहेत. तसंच, 2010, 2011, 2018, 2021 आणि 2023 मध्ये संघाला जेतेपद मिळवून दिलं आहे.

follow us