टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक कोण होणार? BCCI घेणार MS Dhoni ची मदत; जाणून घ्या नेमकं प्रकरण

टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक कोण होणार? BCCI घेणार MS Dhoni ची मदत; जाणून घ्या नेमकं प्रकरण

MS Dhoni :  पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या  T20 विश्वचषकानंतर (T20 World Cup 2024) भारतीय संघाचे (Team India) सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा कार्यकाळ संपणार आहे. यामुळे राहुल द्रविडनंतर टीम इंडियाचा नवीन मुख्य प्रशिक्षक कोण होणार याकडे केवळ भारतीय क्रिकेट चाहत्यांचे नाहीतर संपूर्ण जगातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून आहे.

नवीन मुख्य प्रशिक्षकासाठी बीसीसीआयने (BCCI) जाहिरात देखील दिली आहे मात्र अद्याप बीसीसीआयला अद्याप एकही चांगला उमेदवार सापडलेला नाही. त्यामुळे आता बीसीसीआय टीम इंडियाच्या पुढील मुख्य प्रशिक्षक शोधण्यासाठी भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीची (M.S.Dhoni) मदत घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

माहितीनुसार, आता बीसीसीआयसाठी भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी डील ब्रेकर बनू शकतो. बीसीसीआय टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकासाठी सीएसकेचे (CSK) सध्याचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग (Stephen Fleming) यांच्याकडे देखील पाहत आहे. यामुळे एमएस धोनी बीसीसीआय आणि स्टीफन फ्लेमिंग यांच्या दरम्यान डील ब्रेकर बनू शकतो.

न्यूझीलंडसाठी फ्लेमिंगने तब्बल 303 सामन्यात कर्णधारपद भूषवले आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून तो  सीएसकेचा मुख्य प्रशिक्षक आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपल्यानंतर बीसीसीआयची मुख्य प्रशिक्षक म्हणून फ्लेमिंगला पहिली पसंती आहे मात्र फ्लेमिंग 2027 पर्यंत जबादारी पार पडण्यास नाकार देत आहे.

माहितीनुसार, आयपीएलसारख्या इतर लीगमध्ये अल्पकालीन प्रशिक्षक म्हणून फ्लेमिंग खुश आहे यामुळे तो जास्त वेळ भारतीय संघासोबत राहू शकत नाही. त्यामुळे आता बीसीसीआय एमएस धोनीला डील ब्रेकर बनवून फ्लेमिंगसोबत डील करण्यास सांगणार असल्याची माहिती समोर आली आहे.

WhatsApp युजर्ससाठी आनंदाची बातमी, आपोआप क्लिअर होणार Unread मेसेज

तर दुसरीकडे बीसीसीआय फ्लेमिंगसह गौतम गंभीर,  महेला जयवर्धने आणि जस्टिन लँगर यांच्या नावाचाही विचार करत असल्याची माहिती काही मीडिया रिपोर्ट्समध्ये समोर आली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज