बीसीसीआयचा एक निर्णय अन् हजारो खेळाडूंची चांदी; ‘या’ सहा राज्यांना मोठं गिफ्ट !

बीसीसीआयचा एक निर्णय अन् हजारो खेळाडूंची चांदी; ‘या’ सहा राज्यांना मोठं गिफ्ट !

BCCI Jay Shah : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी (Jay Shah) क्रिकेटमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने अनेक निर्णय घेतले आहेत. आताही त्यांनी असा एक निर्णय घेतला आहे ज्याचा फायदा हजारो खेळाडूंना होणार आहे. इतकेच नाही तर आगामी काळात टीम इंडिया सुद्धा (Team India) मजबूत होईल. यावेळी त्यांनी सहा राज्यांतील क्रिकेट खेळाडूंना असं गिफ्ट दिलं आहे ज्याचा विसर पडणे या खेळाडूंना कधीच शक्य होणार नाही.

बीसीसीआयनं नॉर्थ ईस्ट प्रदेशातील (BCCI) राज्यांच्या खेळाडूंना मदत करण्याच्या उद्देशाने सहा राज्यांत इनडोअर क्रिकेट अकॅडमीच्या कोनशिलेचे अनावरण केले. ही अकॅडमी मणिपूर, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मेघालय, मिझोराम आणि सिक्कीम या राज्यांत सुरू होणार आहे. या राज्यांच्या राजधानीच्या शहरांत अकॅडमी सुरू होणार आहे. या निर्णयाची माहिती जय शाह यांनी ट्विटरवर दिली.

खेळाडूंवर पैशांचा पाऊस! BCCI निर्णयाच्या तयारीत; पगारवाढीचा प्लॅन अंतिम टप्प्यात

नॉर्थ ईस्ट राज्यांत पावसाचे प्रमाण खूप जास्त आहे. मान्सूनच्या काळात तर येथे क्रिकेट जवळपास ठप्प पडलेले असते. या समस्येमुळे येथील खेळाडूंना कोलकाता, मुंबई, बंगळुरू, चेन्नई आणि अहमदाबाद यांंसारख्या शहरांतील इनडोअर सेंटर्समध्ये सराव करावा लागत होता. आता या निर्णयामुळे खेळाडूंच्या अडचणी कमी होणार आहेत. पावसाच्या दिवसांत क्रिकेटच्या सरावासाठी त्यांना अन्य राज्यांत जाण्याची गरज राहणार नाही.

https://x.com/JayShah/status/1792467778081087908?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1792467778081087908%7Ctwgr%5Ebf8292a0dbecbceab1e9e505fba641b494d1263e%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9hindi.com%2Fsports%2Fcricket-news%2Fbcci-jay-shah-lays-foundation-stone-for-indoor-cricket-academies-in-six-north-eastern-states-2621450.html

परंतु आता ही समस्या निकाली निघणार आहे. इनडोअर सेंटरमुळे वर्षभर प्रॅक्टिसची सुविधा उपलब्ध होणार आहे. यामध्ये वर्ल्ड क्लास इनडोर नेट्स, इनडोर स्विमिंग पूल आणि फिटनेस सेंटर उपलब्ध असतील. या फिटनेस सेंटरमध्ये जागतिक दर्जाची मशीन असतील. या सुविधांमुळे नॉर्थ ईस्ट भागातील खेळाडूंच्या अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत.

काय सांगता! सामन्याआधी टॉस होणार नाही? BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत..

रणजी खेळाडूंच्या पगारवाढीचा प्लॅन  

बीसीसीआयने रणजी खेळाडूंच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला तर रणजी खेळाडू रणजी क्रिकेट खेळण्यास प्राधान्य देणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. जर असा निर्णय घेतला गेला तर खेळाडूंचा मात्र नक्कीच फायदा होणार आहे. खेळाडूंच्या मानधनात मोठी वाढ होईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या तुलनेत ही वाढ कमीच राहिल. मात्र तरीदेखील खेळाडूंसाठी नक्कीच फायद्याची ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube