खेळाडूंवर पैशांचा पाऊस! BCCI निर्णयाच्या तयारीत; पगारवाढीचा प्लॅन अंतिम टप्प्यात

खेळाडूंवर पैशांचा पाऊस! BCCI निर्णयाच्या तयारीत; पगारवाढीचा प्लॅन अंतिम टप्प्यात

Domestic Players Salary : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ लवकरच देशांतर्गत क्रिकेट (Domestic Player’s Salary) खेळणाऱ्या खेळाडूंना गुडन्यूज देऊ शकते. या खेळाडूंच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. या संदर्भात निर्णय घेण्यासाठी मंडळाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. मिळालेल्या महितीनुसार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता अजित आगरकरच्या (Ajit Agarkar) नेतृत्वातील निवड समितीला याबाबत शिफारस करण्यास सांगितले आहे. जे खेळाडू टी 20 प्रीमियर लीगमध्ये खेळत नाहीत त्यांना याचा फायदा मिळेल. यासाठी काही नियम देखील तयार करण्यात येतील. या खेळाडूंना वर्षाकाठी 1 कोटी रुपयांपर्यंत मानधन मिळू शकते.

क्रिकबजच्या एका रिपोर्टनुसार बोर्ड रणजी ट्रॉफीमध्ये 10 सामने खेळणाऱ्या खेळाडूंना 75 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत वार्षिक मानधन देऊ शकते. सध्याच्या परिस्थितीत खेळाडूंच्या अनुभवानुसार पगार दिला जातो. रणजी ट्रॉफीमध्ये 40 पेक्षा जास्त सामने खेळणाऱ्या खेळाडूंना 60 हजार रुपये मिळतात. तर 21 ते 40 सामने खेळलेल्या खेळाडूंना 50 हजार रुपये मिळतात.

रोहित शर्मा अन् आगरकर ठरवतील तसं.. T20 वर्ल्डकपसाठी कार्तिकचा क्लिअर मेसेज

तसेच 20 सामने खेळलेल्या खेळाडूंना 40 हजार रुपये मिळतात. रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचणाऱ्या संघातील सिनियर खेळाडू 25 लाख रुपयांपर्यंत कमाई करतात. तर दुसऱ्या संघातील खेळाडूंना अनुभवाच्या आधारावर 17 ते 22 लाख रुपयांपर्यंत पैसे मिळतात.

दरम्यान, याआधी बीसीसीआयकडून कसोटी क्रिकेटसाठी खास स्कीम सुरू करण्यात आली आहे. भारतीय संघासाठी 75 टक्क्यांपेक्षा जास्त कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूंचे सामना शुल्क 300 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. सध्याच्या काळात एका खेळाडूला 15 लाख रुपये मिळतात. बोर्डाला असे वाटत होते की टी 20 क्रिकेट खेळण्याच्या नादात अनेक खेळाडू कसोटी क्रिकेटकडे दुर्लक्ष करत आहेत. याच कारणामुळे हा निर्णय घेण्यात आला.

T20 World Cup : राहुल, संजू, ऋषभ अन् कार्तिक; कुणाला मिळणार संधी? लवकरच घोषणा

बीसीसीआयने रणजी खेळाडूंच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला तर रणजी खेळाडू रणजी क्रिकेट खेळण्यास प्राधान्य देणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. जर असा निर्णय घेतला गेला तर खेळाडूंचा मात्र नक्कीच फायदा होणार आहे. खेळाडूंच्या मानधनात मोठी वाढ होईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या तुलनेत ही वाढ कमीच राहिल. मात्र तरीदेखील खेळाडूंसाठी नक्कीच फायद्याची ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube