ऋषभ पंत क्रिकेटमध्ये कमबॅक कधी करणार? BCCI ने दिली महत्वाची अपडेट

ऋषभ पंत क्रिकेटमध्ये कमबॅक कधी करणार? BCCI ने दिली महत्वाची अपडेट

Rishabh Pant : टीम इंडियाचा विकेटकीपर आणि फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) मागील दोन वर्षांपासून संघाबाहेर आहे. सन 2022 मध्ये एका कार अपघातात पंत गंभीर जखमी झाला होता. तेव्हापासून तो संघात परतलेला नाही. या अपघातानंतर त्याचे क्रिकेट करिअर संपल्याचेही सांगितले जात होते. परंतु, आता पंत पुन्हा क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार असल्याची माहिती समोर आली होती. यावर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) माहिती दिली आहे.

ऋषभ पंतच्या फिटनेसबाबत माहिती देण्यासाठी बीसीसीआयने एक ट्विट केले आहे. ऋषभ पंत 30 डिसेंबर 2022 रोजी कार अपघातात जखमी झाला होता. पण आता 14 महिन्यांनंतर त्याला टी 20 क्रिकेट लीगसाठी तंदुरुस्त असल्याचे घोषित करण्यात येत आहे, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. दुखापत झाल्याने मागील 2023 मधील स्पर्धेत त्याला सहभागी होता आले नाही. आता दीड वर्षांनंतकर ऋषभ पंत पुन्हा मैदानावर दिसणार आहे.

अपघात कसा झाला होता?

पंत ज्यावेळी दिल्लीतून आपल्या घराकडे निघाला होता त्यावेळी दिल्ली-देहरादून महामार्गावर त्याचा कारचा अपघात झाला होता. या अपघातात पंत गंभीर जखमी झाला होता. यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर त्याला चालताही येणे कठीण झाले होते. मात्र, त्याने मोठ्या हिंमतीने या दुखापतीवर मात केली.

Rishabh Pant : ऋषभ पंत वर्ल्डकप खेळणार का? टीम इंडियातील कमबॅकचा अपडेट मिळाला

पंत देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल त्यानंतर भारतीय संघात त्याचा समावेश केला जाईल, अफगाणिस्तान विरोधात होणाऱ्या तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियात वापसी करेल असे आधी सांगण्यात आले होते. मात्र, या मालिकेतही पंत दिसला नाही. त्यानंतर इंग्लंडविरोधात झालेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतही पंत नव्हता. त्यामुळे तो क्रिकेटमध्ये केव्हा वापसी करणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अखेर या प्रश्नाचे उत्तर बीसीसीआयने दिले. पंत लवकर बरा होणे संघासाठीही गरजेचे आहे. कारण, पुढील वर्षात टी 20 वर्ल्डकप स्पर्धा होणार आहेत. या प्रकारातील क्रिकेटचा पंत हा दमदार खेळाडू आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube