Rishabh Pant : ऋषभ पंत वर्ल्डकप खेळणार का? टीम इंडियातील कमबॅकचा अपडेट मिळाला

Rishabh Pant : ऋषभ पंत वर्ल्डकप खेळणार का? टीम इंडियातील कमबॅकचा अपडेट मिळाला

Rishabh Pant : टीम इंडियाचा विकेटकीपर आणि फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) दुखापतग्रस्त झाल्याने अनेक दिवसांपासून संघाबाहेर आहे. विश्वचषकातही (World Cup 2023) तो दिसलेला नाही. आता त्याच्याबाबत महत्वाची माहिती हाती आली आहे. ऋषभ पंत दुखापतीतून हळूहळू सावरत असून त्याने क्रिकेटचा सराव पुन्हा सुरू केला आहे. या वर्षाच्या अखेरीस किंवा नव्या वर्षाच्या सुरुवातीला तो टीम इंडियात (Team India) पुनरागमन करेल, अशी शक्यता आहे. ऋषभ पंतच्या कारचा मागील वर्षात अपघात झाला होता. या अपघातात तो जखमी झाला होता. पंत सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सराव करत आहे. बऱ्याच दिवसांपासून तो याच ठिकाणी आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेल्या काही जाहिरातीत पंत दिसला होता. त्यामुळे तो आता लवकरच क्रिकेटमध्ये वापसी करेल अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

IND vs ENG: हार्दिक पंड्या विश्वचषकात परतणार का? समोर आली मोठी अपडेट

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंत आधी देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल त्यानंतर भारतीय संघात त्याचा समावेश केला जाईल. 23 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या विजय हजारे एकदिवसीय मालिकेत पंत दिसेल. या मालिकेनंतर पुढील वर्षात अफगाणिस्तान विरोधात होणाऱ्या तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियात वापसी करेल. पंत लवकर बरा होणे संघासाठीही गरजेचे आहे. कारण, पुढील वर्षात टी 20 वर्ल्डकप स्पर्धा होणार आहेत. या प्रकारातील क्रिकेटचा पंत हा दमदार खेळाडू आहे.

अपघात कसा झाला होता?

पंत ज्यावेळी दिल्लीतून आपल्या घराकडे निघाला होता त्यावेळी दिल्ली-देहरादून महामार्गावर त्याचा कारचा अपघात झाला होता. या अपघातात पंत गंभीर जखमी झाला होता. यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर त्याला चालताही येणे कठीण झाले होते. मात्र, त्याने मोठ्या हिंमतीने या दुखापतीवर मात केली.

हार्दिक पांड्याही संघाबाहेर 

भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध गोलंदाजी करताना जखमी झाला आणि तेव्हापासून तो संघाबाहेर आहे. दुखापतीमुळे हार्दिक न्यूझीलंडविरुद्ध खेळू शकला नाही आणि आता तो रविवारी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडला आहे. हार्दिक पंड्याच्या पायाला दुखापत झाली होती. असे मानले जात आहे की त्याला तंदुरुस्त होण्यासाठी थोडा वेळ लागेल. अशा परिस्थितीत तो भारतासाठी पुढील सामना कधी खेळणार याविषयी एक मोठे अपडेट समोर आली आहे.

NED vs BAN: नेदरलँड्सचा विश्वचषकात दुसरा उलटफेर, बांग्लादेशचा 87 धावांनी पराभव

हार्दिक पंड्याबद्दल इनसाइड स्पोर्ट्सशी बोलताना बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, जर टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहोचली तर हार्दिक पंड्या थेट तोच सामना खेळेल. हार्दिक पंड्या सध्या इंग्लंड आणि श्रीलंकेविरुद्धचे सामने खेळणार नाही. तो आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, पण बाद फेरीत म्हणजेच उपांत्य फेरीत तो आमच्यासाठी अधिक महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे जर आपण इंग्लंड आणि श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली तर हार्दिक पंड्या थेट उपांत्य फेरीतच खेळेल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube