अभिषेक शर्मा फ्लॉप, ईशान किशनची वादळी सुरूवात, 40 मध्ये 80 करून पाकला फोडला घाम

पाकिस्तानच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा याने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.

  • Written By: Published:
News Photo   2026 02 15T194539.405

भारताला सामन्याच्या सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. भारताचा पहिला बळी कर्णधार सलमान आगा याने घेतला. त्याने पहिल्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर अभिषेक शर्माला झेल बाद केले. यामध्ये वादळी खेळी करून ईशान किशनने पाकिस्तानला घाम फोडला आहे. किशनने 40 बॉलमध्ये 80 रन केरून तो आऊट झाला. आता कर्नधार सुर्यकुमार आणि तिलक ही जोडी खेळत आहे.

पाकिस्तानच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा याने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानने या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हन कोणताही बदल केलेला नाही. तसंच, टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 बदल करण्यात आले आहेत. टीम इंडियाचा ओपनर अभिषेक शर्मा याचं कमबॅक झालं आहे. त्यामुळे संजू सॅमसन याला बाहेर व्हावं लगालं आहे. तर कोलंबोतील ही खेळपट्टी फिरकीपटूंसाठी पोषक असल्याने अर्शदीप सिंह याच्या जागी कुलदीप यादव याला संधी देण्यात आली आहे.

ड टु हेड रेकॉर्ड्स

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात एकूण 8 सामने खेळवण्यात आले आहेत. भारताने या 8 पैकी 7 सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तानला एकमेव सामना जिंकता आला आहे. तर एकूणच टी 20i क्रिकेटमध्ये दोन्ही संघात एकूण 16 सामने झाले आहेत. त्यापैकी भारताने 13 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर पाकिस्तानला 3 सामनेच जिंकता आले आहेत.

1 विरुद्ध 6

टीम इंडिया आणि पाकिस्तान हा सामना 1 विरुद्ध 6 अशी लढत आहे. टीम इंडिया आयसीसी टी 20I रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी आहे. तर पाकिस्तान सहाव्या क्रमांकावर विराजमान आहे.

टीम इंडियाचा ‘दस का दम

टीम इंडियाने आतापर्यंत आयसीसी टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत सलग 10 सामने जिंकले आहेत. भारताने नामिबिया आणि त्याआधी यूएसएवर मात केली आहे. तर भारताने टी 20I वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत खेळलेले सर्व 8 सामने जिंकले होते.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह.

पाकिस्तानचे 11 खेळाडू : सलमान आगा (कॅप्टन), सॅम अयुब, साहिबजादा फरहान, बाबर आझम, मोहम्मद नवाज, शादाब खान, फहीम अश्रफ, उस्मान खान (विकेटकीपर), शाहीन आफ्रिदी, अबरार अहमद आणि उस्मान तारीक.

No liveblog updates yet.

LIVE NEWS & UPDATES

follow us