ठाकरेंचा खास ‘मोहरा’ विदेशात जाणार; भाजप नेते शेलारांनी पुढाकार घेत सांगितली नामी संधी

जी पाकिस्तानची भूमिका आहे. जी भूमिका हिरव्या पाकड्यांची आहे तीच भूमिका संजय राऊत यांची आहे असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.

  • Written By: Published:

भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव करत आशिया चषक २०२५ च्या जेतेपदावर आपलं नाव कोरलं. (India-Pakistan) पाकिस्तानला हरवल्यानंतर भारताने ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. आता यावरून अनेक ठिकाणी राजकारण चांगलच तापलं आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांची संजय राऊतांवर जोरदार घणाघात केला आहे.

जी पाकिस्तानची भूमिका आहे. जी भूमिका हिरव्या पाकड्यांची आहे तीच भूमिका संजय राऊत यांची आहे असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे. पाकिस्तान हरला याचं त्यांना दु:ख झालं की काय असंही शेलार म्हणाले आहेत. तसंच, पाकिस्तानला जो धक्का भारताने दिला त्यामध्ये ते लडखडत आहेत असंही ते म्हणाले.

Asia Cup 2025 : ट्रॉफीशिवाय सेलिब्रेशन! टीम इंडियाने मैदान गाजवले, Photo एकदा पाहाच

मिलींद नार्वेकर यांनी भारतीय विजयाच सेलिब्रेशन केलं आहे. ते सर्व भारतीय करतोय. परंतु, असा आनंद व्यक्त उद्धव ठाकरे आणि संजय राऊत का करत नाहीत असा प्रश्न गल्लोगल्ली त्यांना विचारला पाहिजे. त्यांच्या मनात भारत जिंकल्याची पोटदुखी आहे. मला आठवत नाही पण कुठल्यातही देशात राष्ट्राध्यक्ष पदासाठी माणूस शोधत आहेत. त्या देशात संजय राऊत यांनी अर्ज करावा त्यांना नक्की तिथ स्थान मिळे असंही शेलार म्हणाले.

राऊत काय म्हणाले?

मैदानावर स्वरूप वेगळं आहे आणि आतलं स्वरूप वेगळं आहे. तुम्ही कोणाला मूर्ख बनवत आहात? तुम्ही पंतप्रधानांपासून देशाला मूर्ख बनवायची प्रेरणा घेतली आहे का? असा थेट सवाल राऊतांनी टीम इंडियाच्या खेळाडूंना विचारला आहे. तसेच हे आता लोकांसमोर येणे गरजेचे आहे. तुम्ही सामना खेळलाच का? असेही राऊतांनी विचारले आहे.

follow us