ओटीटी गाजवल्यानंतर प्रेक्षकांची लाडकी सुंदरा पुन्हा टेलिव्हिजनवर! आगामी मालिकेत ‘ही’ भूमिका साकारणार

Akshaya Naik आता छोट्या पडद्यावर दिसण्यासाठी सज्ज झाली आहे. अँड टीव्ही वर येणाऱ्या आगामी मालिकेत अक्षया महत्वपूर्ण भूमिका साकारणार

Akshaya Naik

After making OTT a hit, audience favorite Akshaya Naik is back on television : हिंदी टेलिव्हिजन विश्वातून सुरू झालेला तिचा प्रवास आज ओटीटी पर्यंत येऊन पोहचला आणि आता पुन्हा प्रेक्षकांची लाडकी सुंदरा म्हणजे अभिनेत्री अक्षया नाईक आता छोट्या पडद्यावर दिसण्यासाठी सज्ज झाली आहे. अँड टीव्ही वर येणाऱ्या आगामी मालिकेत अक्षया महत्वपूर्ण भूमिका साकारणार असल्याचं कळतंय.

ब्लॅक बॉक्स पाऊस, ऊन, आग आणि बॉम्बस्फोटापासून सुरक्षित पण… अजितदादांच्या अपघाताबाबत रोहित पवारांचं मोठं विधान

” हे भगवान कितना बदल गया इंसान” या आगामी मालिकेत ती काय भूमिका साकारणार या साठी सगळेच उत्सुक आहेत. अक्षयाने तिच्या करीयरची सुरुवात ही हिंदी मालिका पासून सुरू केली होती पुढे मराठी मालिका मग ओटीटी असा तिचा प्रवास आज दमदार सुरू आहे.

उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ‘सुपर सनी मंथ’ क्रीडा महोत्सव; सनी निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

अक्षया नुकतीच नेटफ्लिक्सच्या बहुचर्चित वेब सीरिज असलेल्या तस्करी मध्ये दिसली होती. बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मी सोबत असलेल्या तिच्या या खास भूमिकेचं देखील प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं आहे. लेडी स्मगलर असलेल्या स्वाती साळुंखे ही तिची भूमिका लक्षवेधी ठरली. सोबतीला ग्रेटर कलेश सारख्या चित्रपटात देखील तिच्या छोट्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक झालं होत.

सोशल मीडियावर स्टोरी ठेवल्याचा राग अनावर; दोन गटातील हाणामारीत एकाचा मृत्यू

ओटीटी गाजवून पुन्हा टीव्ही वर येण्याबद्दल अक्षया सांगते ” या नव्या मालिकेसाठी खरतर मी खूप उत्सुक आहे. टेलिव्हिजन करण्याचा सगळ्यात मोठा फायदा हा असतो की एक कलाकार म्हणून रोज त्या कलेचा सराव होत असतो आणि कुठेतरी मी माझ्या आयुष्यात हे रूटीन मिस करत होते. आता या मालिकेमुळे पुन्हा रोज काम करत राहण्यातली मज्जा अनुभवयाला मिळणार अशी आशा आहे. या मालिके निमित्तानं नवीन लोकांबरोबर काम करायला मिळतंय याचा आनंद देखील वेगळा आहे”अभिनय, फॅशन इथेच न थांबता क्लाऊनिंग सारख्या विशेष आर्ट फॉर्म मधून प्रेक्षकांचं ती विशेष मनोरंजन करताना दिसतेय.

follow us