रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना घेरले ! पाच महत्त्वाचे मुद्दे
Rohit Pawar : VSR कंपनी आणि तिच्या मालकांना चौकशीपासून वाचवण्यासाठी कोणीतरी प्रभावशाली व्यक्ती प्रयत्न करत आहे.
Rohit Pawar On Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघातातील मृत्यू प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतलीय. आजच्या पत्रकार परिषदेतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे VSR व्हेंचर्स विमान कंपनीच्या मालकांना असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीबीआयकडे करण्याची सोपवण्याची मागणी केली आहे.
1) रोहित सिंह यांच्याबरोबर फडणवीसांचा काय संबंध
रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मफलर घातल्याचा एक फोटो दाखवलाय. हा फोटो VSR कंपनीचे मालक व्ही. के. सिंह यांचा मुलगा रोहित सिंह यांच्या जयपूर येथे 21 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या लग्नातील असल्याचा दावा त्यांनी केला. या छायाचित्रात फडणवीस यांच्यासोबत राघव शर्मा नावाची व्यक्ती दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याच्या एक दिवस आधी हा विवाहसोहळा पार पडला होता. या फोटोचा संदर्भ देत रोहित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि VSR कंपनीच्या मालकांमध्ये जवळचे संबंध असल्याचा आरोप केला.
2) व्हीएसआर कंपनीला फडणवीस वाचवितात ?
VSR कंपनी आणि तिच्या मालकांना चौकशीपासून वाचवण्यासाठी कोणीतरी प्रभावशाली व्यक्ती प्रयत्न करत असल्याचा आरोप रोहित पवार यापूर्वीही करत आले आहेत. यासाठी त्यांनी ‘मफलर मॅन’ असा उल्लेख केला होता. सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेतही त्यांनी हाच मुद्दा उपस्थित केला आहे.
3) अपघात प्रकरणी व्हीएसआरवर एफआयआर का नाही ?
व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडने पुरविलेल्या विमानाचा बारामतीत अपघात झालेला नाही. या प्रकरणात अद्याप एफआयआर का दाखल करण्यात आलेला नाही ? तसेच तपास सीबीआयकडे का सोपवण्यात आलेला नाही? असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.
4) फडणवीसांच्या मित्रांशी व्ही. के. सिंह यांचे आर्थिक संबंध
व्ही. के. सिंह यांचे फडणवीस यांच्या काही मित्रांशी आर्थिक संबंध आहेत. मात्र, अजित पवार यांना न्याय मिळणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे व्ही. के. सिंह आणि त्यांच्या VSR कंपनीविरोधातील तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती असल्याचे रोहित पवारांनी म्हटले आहे.
5) फाईलची देवाणघेवाण करण्यासाठी भेट झाली होती का ?
मुख्यमंत्री या अपघातात सहभागी आहेत, असे मी म्हणत नाही. मात्र, व्ही. के. सिंह यांचा या प्रकरणात नक्कीच सहभाग आहे. मग त्यांना वाचवले का जात आहे? पत्रकार रजत शर्मा यांच्या मुलीच्या लग्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेले होते. त्यावेळी रात्री व्ही. के. सिंह त्यांना दिल्ली विमानतळावर भेटले होते. एक फाईल त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली होती. मुख्यमंत्री व्हीएसआर आणि व्ही. के. सिंहला वाचवत आहात, असा आरोप रोहित पवारांनी केला आहे.