अजित पवार अपघात प्रकरणी ‘मफलर’चे पोस्टर चर्चेत; 16 नोव्हेंबरला मोठा खुलासा होणार?

Ajit Pawar Plane Crash Case; 'अजितदादांच्या अपघात-घातपातामागे असलेल्यांना वाचवणारा नेता कोण?' असा सवाल या पोस्टरमधून उपस्थित करण्यात आला.

Ajit Pawar Plane Crash Case Muffler Leader Poster

Ajit Pawar Plane Crash Case Muffler Leader Poster: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातामागे घातपात असल्याचा संशय आणि या प्रकरणातील तपासावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर लावण्यात आलेल्या एका पोस्टरने सध्या राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘अजितदादांच्या अपघात-घातपातामागे असलेल्यांना वाचवणारा नेता कोण?’ असा सवाल या पोस्टरमधून उपस्थित करण्यात आला आहे.

मतदारानंतर आता सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अपहरणाचा डाव, अमित देशमुखांचा खळबळजनक आरोप!

या पोस्टरवर एका मफलरची प्रतिकृतीही दाखवण्यात आली आहे. तसेच 16 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी 4 वाजता वाय. बी. चव्हाण सेंटर येथे उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, पोस्टरवर कोणत्याही नेत्याचे नाव किंवा आयोजकांची माहिती देण्यात आलेली नाही. मात्र 16 नोव्हेंबरला याच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची पत्रकार परिषद होणार आहे. रोहित पवार यांनी स्वतः त्यांच्या ‘एक्स’ अकाऊंटवर पोस्टरचा फोटो शेअर करत पत्रकार परिषदेची माहिती दिली आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेत ते कोणता मुद्दा मांडणार आणि कोणत्या नेत्याबाबत काही खुलासा करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

काय आहे मफलरवाल्या नेत्याचे प्रकरण?

अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्रकरणात व्हीएसआर (VSR) कंपनीला वाचवण्यासाठी एका बड्या नेत्याकडून प्रयत्न होत असल्याचा आरोप यापूर्वी करण्यात आला होता. या कथित नेत्याचा उल्लेख ‘मफलरवाला नेता’ असा करण्यात आला होता. संबंधित नेत्याचे नाव आणि त्याच्याविरोधातील पुरावे योग्य वेळी समोर आणू, असेही राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून सांगण्यात आले होते.

सस्पेन्स आणि क्राईमचा अनोखा खेळ मोठ्या पडद्यावर! ‘मिरांडा वॉर्निंग’चा ट्रेलर प्रदर्शित!

आता वाय. बी. चव्हाण सेंटरबाहेरील पोस्टरवर पुन्हा मफलरची प्रतिकृती झळकल्याने या प्रकरणाची चर्चा नव्याने सुरू झाली आहे. त्यामुळे 16 नोव्हेंबरच्या पत्रकार परिषदेत रोहित पवार नेमका कोणता गौप्यस्फोट करणार, याची उत्सुकता वाढली आहे.

follow us