‘मला याची किंमत मोजावी लागेल…’रोहित पवार असं का म्हणाले? कशाची अन् कुणाची भीती?

Ajit Pawar Plane Crash Case : अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात रोहित पवार यांनी थेट फडणवीसांवर गंभीर आऱोप केले आहेत.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 11 16T181237.566

Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash Case : अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणातील संशयास्पद बाबी समोर आणताना आपल्याला राजकीय परिणामांना सामोरे जावे लागू शकते, याची जाणीव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, सत्य बाहेर आणण्यासाठी कोणत्याही दबावाला बळी पडणार नसल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मफलर परिधान केलेला फोटो दाखवत काही गंभीर प्रश्न उपस्थित केले. अजित पवार यांच्या अपघात प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या कंपनीला वाचवण्यासाठी एक प्रभावशाली व्यक्ती प्रयत्न करत असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, संबंधित व्यक्तीच अजित पवार यांच्या अपघातामागे आहे, असा थेट आरोप आपण करत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ते मफलर मॅन’ फडणवीस; अजित पवार अपघात प्रकरणात रोहित पवारांचा गंभीर आरोप

स्वतःच्या काकांच्या निधनामागील सत्य शोधण्यासाठी आपण लढत असल्याचे सांगताना रोहित पवार यांनी भावनिक भूमिका मांडली. स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी आपण तडजोड केली, तर सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचा नैतिक अधिकार उरणार नाही, असे ते म्हणाले. त्यामुळे या प्रकरणात कोणाचेही नाव घेण्यास किंवा प्रश्न उपस्थित करण्यास आपण मागेपुढे पाहणार नसल्याचे त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले.

‘मला कदाचित याची राजकीय किंमत मोजावी लागेल, पण त्याची मला चिंता नाही,’ या आशयाच्या विधानातून रोहित पवार यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली. अजित पवार यांच्या अपघाताचा तपास, संबंधित कंपनीची भूमिका आणि त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न यामुळे आता या प्रकरणाला नवे राजकीय वळण मिळाले आहे. दरम्यान, रोहित पवार यांनी केलेल्या दाव्यांवर संबंधितांकडून काय प्रतिक्रिया येते आणि तपास यंत्रणा याबाबत काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

follow us