T20 World Cup : हार्दिक पांड्या अडचणीत, ‘त्या’ प्रकरणात पुण्यात गुन्हा दाखल
T20 World Cup : भारताचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्या टी20 विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यानंतर सोशल मीडियावर चर्चेत आहे. तर आता
T20 World Cup : भारताचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्या टी20 विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यानंतर सोशल मीडियावर चर्चेत आहे. तर आता त्याच्याविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय ध्वजाचा अपमान केल्याने त्याच्याविरुद्ध पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टी20 विश्वचषक 2026 च्या (T20 World Cup) अंतिम सामन्यात भारतीय संघाने शानदार कामगिरी करत न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करत ही स्पर्धा तिसऱ्यांदा जिंकली.
या शानदार विजयानंतर भारतीय खेळाडूंनी जल्लोष केला. यावेळी हार्दिक पांड्याने गर्लफ्रेंडसोबत विजयाचा आनंद साजरा करताना भारतीय ध्वजाचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हार्दिक पांड्यावर आरोप काय?
तक्रारीनुसार, भारतीय खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) गर्लफ्रेंडसोबत बसला होता. यानंतर तो जमिनीवर झोपला तेव्हा त्याच्या अंगावर असणारा तिरंगा खाली पडला होता आणि तो त्यावर लोळलेला होता असे करुन हार्दिकने भारतीय ध्वजाचा अपमान केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला असून या प्रकरणात आता पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वकील वाजेद खान यांनी या प्रकरणात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आता या प्रकरणात तपास सुरु करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
#WATCH | Pune: Advocate Wajid Khan says, “You must have seen the T20 World Cup here. Hardik Pandya was dancing with his girlfriend in celebration of his victory. The national flag was tied to his back… According to Section 2 of the 1971 National Flag Act, we should respect the… pic.twitter.com/mHVHn336ql
— ANI (@ANI) March 12, 2026
अमेरिका – इराण युद्धादरम्यान विधानभवन उडवून देण्याची धमकी ; मुंबई पोलीस अॅक्शन मोडवर-
तर दुसरीकडे टी20 विश्वचषक 2026 मध्ये भारतासाठी हार्दिक पांड्याने शानदार कामगिरी करत 9 सामन्यात 27.12 च्या सरासरीने 217 धावा केल्या आणि नऊ विकेट्सही घेतल्या. तर माझ्यात अजूनही 10 वर्षे क्रिकेट शिल्लक असून मला आणखी 10 आयसीसी विजेतेपदे जिंकायची आहेत हे माझे ध्येय आहे असं माध्यमांशी बोलताना हार्दिक म्हणाला आहे.
