अमेरिका – इराण युद्धादरम्यान विधानभवन उडवून देण्याची धमकी ; मुंबई पोलीस अॅक्शन मोडवर
Vidhan Bhavan : एकीकडे अमेरिका, इस्त्रालय आणि इराणदरम्यान युद्ध सुरु आहे. अमेरिका आणि इस्त्रायल संयुक्तपणे इराणवर हल्ला करत आहे तर
Vidhan Bhavan : एकीकडे अमेरिका, इस्त्रालय आणि इराणदरम्यान युद्ध सुरु आहे. अमेरिका आणि इस्त्रायल संयुक्तपणे इराणवर हल्ला करत आहे तर इराण देखील प्रत्युत्तर देत इस्त्रायल आणि अरब देशांत असणाऱ्या अमेरिकी तळांवर जोरदार हल्ले करत आहे. तर दुसरीकडे आता मुंबई पोलिसांना विधानभवन बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
ई-मेलद्वारे मुंबई पोलिसांना ही धमकी मिळाली आहे. सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget Session) सुरु असल्याने मुंबई पोलीस अॅक्शन मोडमध्ये असून पोलिसांनी विधानभवनातील (Vidhan Bhavan) कर्मचारी आणि नागरिकांना सुरक्षितरित्या इमारतीबाहेर काढले आहे. तसेच सुरक्षेचा उपाय म्हणून सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आत येण्यास मनाई करण्यात आलीय.
बॉम्ब शोधक पथक, मुंबई पोलिसांचे (Mumbai Police) विशेष पथक आणि नाशक पथक सध्या विधानभवन परिसराची तपासणी करत आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असल्याने विधानभवन परिसरात राजकीय नेत्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी इमारतीमधील सर्व नागरिकांना त्वरित बाहेर जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.
तर दुसरीकडे अमेरिका (America) , इस्त्रायल (Israel) आणि इराण (Iran) दरम्यान सुरु असणाऱ्या युद्धाचा आज तेरावा दिवस असून आतापर्यंत या युद्धात तिन्ही देशातील अनेक नागरिक मारले गेले आहे. तर या युद्धामुळे अनेक देशांमध्ये तेल पुरवठा विस्कळीत झाला आहे. भारताला देखील या युद्धाचा मोठा फटका बसला असून अनेक शहरात गॅस खरेदीसाठी मोठमोठ्या रांगा दिसून येत आहे.
