उपेंद्र लिमयेंच्या आवाजात उलगडणार गुन्ह्यांच्या कथा; ‘क्राइम पेट्रोल’ मराठी’ची नवी सुरुवात

सत्य घटनांमधून गुन्ह्यांचे धक्कादायक पैलू समोर आणणारा लोकप्रिय कार्यक्रम आता मराठीत येतोय, खास गोष्ट अनुभवायला मिळणार आहे.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 10 24T182553.016

देशभरात लोकप्रिय ठरलेली ‘क्राइम पेट्रोल’ ही (Crime Patrol) मालिका आता मराठी भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते उपेंद्र लिमये या मालिकेचं सूत्रसंचालन करणार असून, 26 ऑक्टोबरपासून या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. सोमवार ते शनिवार रात्री 10 वाजता सोनी मराठी आणि Sony LIV वर ही मालिका पाहता येईल. सत्य घटनांवर आधारित गुन्ह्यांच्या कथा मराठी प्रेक्षकांसमोर मांडत समाजात जागरूकता निर्माण करण्याचा या कार्यक्रमाचा प्रयत्न असेल.

दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या घटनांकडे सजगपणे पाहणं आणि कोणताही निर्णय घेताना विचार करणं किती महत्त्वाचं आहे, यावर ‘क्राइम पेट्रोल मराठी’मध्ये भर दिला जाणार आहे. सत्य घटनांमधून गुन्ह्यांची पार्श्वभूमी उलगडतानाच धोक्याचे संकेत वेळीच ओळखणं, अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवताना सावध राहणं आणि परिस्थितीचं गांभीर्य समजून घेणं याबाबत प्रेक्षकांना जागरूक केलं जाईल. केवळ गुन्ह्यांची माहिती देण्यापुरताच मर्यादित न राहता, समाजातील प्रत्येक व्यक्तीला सतर्क राहण्याचा संदेशही या मालिकेतून दिला जाणार आहे.

हृतिक रोशन परमवीर सिंह चीमाच्या अभिनयाने प्रभावित; थेट म्हणाला, ‘मी तुमचा चाहता आहे’

या कार्यक्रमाच्या माध्यमातून चुकीच्या विचारांना आळा घालून चांगले विचार समाजात पोहोचवण्याचं आवाहन करण्यात येणार आहे. आजच्या डिजिटल युगात एखादी गोष्ट काही क्षणांत व्हायरल होते. अशा परिस्थितीत जनजागृती करणारे संदेशही अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं असल्याचं उपेंद्र लिमये यांनी म्हटलं आहे. अभिनेता म्हणून कथांचा लोकांच्या मनावर होणारा प्रभाव आपण अनुभवला असून, या मालिकेतून प्रेक्षकांना विचार करायला, प्रश्न विचारायला आणि अधिक सतर्क राहायला प्रोत्साहित करण्याचा आपला प्रयत्न असेल, असं त्यांनी सांगितलं.

‘क्राइम पेट्रोल मराठी’शी जोडले गेल्याचा आनंद व्यक्त करत उपेंद्र लिमये यांनी सुरक्षित समाज घडवण्यासाठी प्रत्येकाची जबाबदारी असल्याचं अधोरेखित केलं. चुकीच्या गोष्टींपासून दूर राहणं आणि योग्य विचारांना प्रोत्साहन देणं, हा या मालिकेच्या संदेशाचा महत्त्वाचा भाग असेल. गुन्ह्यांच्या सत्य घटनांमधून सावधगिरीचं महत्त्व अधोरेखित करणारा हा कार्यक्रम २६ ऑक्टोबरपासून सोमवार ते शनिवार रात्री १० वाजता सोनी मराठी आणि Sony LIV वर प्रसारित होणार आहे.

follow us