‘कोण होणार करोडपती’: ‘फास्टेस्ट फिंगर फर्स्ट’ जिंकताच माधुरींच्या चाहत्याचा जल्लोष, ब्लेझर काढून केला डान्स!

Kon Honar Karodpati Madhuri Dixit; ‘कोण होणार करोडपती’मध्ये फास्टेस्ट फिंगर फर्स्ट जिंकताच माधुरी दीक्षितच्या चाहत्याने डान्स केला.

Kon Honar Karodpati Madhuri Dixit

Kon Honar Karodpati Madhuri Dixit: टी-शर्टवर माधुरी दीक्षित यांचा फोटो आणि समोर प्रत्यक्ष माधुरी! जळगावच्या शरद राजपूत यांच्यासाठी आपल्या लाडक्या अभिनेत्रीसमोर हॉट सीटवर बसण्याची संधी म्हणजे स्वप्नपूर्तीच. ‘कोण होणार करोडपती’च्या पहिल्या स्पर्धकाची झलक दाखवणाऱ्या या व्हिडिओमध्ये त्यांचा आनंद पाहण्यासारखा आहे. ‘फास्टेस्ट फिंगर फर्स्ट’ जिंकताच शरद यांनी चक्क ब्लेझर काढला आणि सेटवर नाचत जल्लोष केला! त्याच वेळी त्यांच्या टी-शर्टवरचा माधुरींचा फोटोही झळकला!

‘दृश्यम द कन्क्लूजन’च्या शेवटावर प्रेक्षकांमध्ये चर्चा; दिग्दर्शक अभिषेक पाठक म्हणाले, “ही मोठी जबाबदारी होती”

या भागातील आणखी एक मनोरंजक क्षण म्हणजे जेव्हा माधुरीने शरद यांना त्यांच्या पत्नीबद्दल बोलतं केलं. त्यावर शरद हसून म्हणाले, “ती माझं सगळं ऐकते.” हे ऐकून माधुरीने लगेचच फिरकी घेत विचारले, “ती फक्त ऐकते की कधीकधी ऐकवते देखील?” माधुरीचा हा मिश्किल प्रश्न ऐकून संपूर्ण सेटवर एकच हशा पिकला.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

कोण होणार करोडपती या शोमधून माधुरी आता सूत्रसंचालकाच्या भूमिकेत येत असून, प्रेक्षकांना तिच्या चाहत्यांसोबतच्या अशाच दिलखुलास गप्पा, भावूक करणाऱ्या कथा आणि अविस्मरणीय क्षण पाहायला मिळणार आहेत.

शेवटच्या चेंडूपर्यंत अटीतटीची लढत! पाकिस्तानला अखेरच्या चेंडूवर धक्का; भारतानं जिंकलं आशियाई क्रीडा स्पर्धेचं सुवर्णपदक

माधुरींच्या सूत्रसंचालनात रंगणाऱ्या या नव्या पर्वात प्रेक्षकांना अशाच मनमोकळ्या गप्पा, मनाला भिडणारे अनुभव आणि चाहत्यांसोबतचे अविस्मरणीय क्षण पाहायला मिळणार आहेत.

पाहा ‘कोण होणार करोडपती’, 12 ऑक्टोबरपासून सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता, सोनी मराठी आणि Sony LIV वर.

follow us