गोवा विधानसभा निवडणुकीसाठी सतेज पाटलांवर मोठी जबाबदारी; स्क्रीनिंग कमिटीवर नियुक्ती, दिला मोठा शब्द

Satej Patil Goa Congress Screening Committee : गोवा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून सतेज उर्फ बंटी पाटलांवर मोठी जबाबदारी.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 11 17T194700.915

Satej Patil Goa Congress Screening Committee : गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने संघटनात्मक तयारीला वेग दिला असून, आगामी निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड करण्याकरिता स्क्रीनिंग कमिटी स्थापन केली आहे. या समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल काँग्रेस नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानले आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, पक्षाचे संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल आणि संपूर्ण पक्ष नेतृत्वाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या या स्क्रीनिंग कमिटीमध्ये सतेज उर्फ बंटी पाटील यांच्यासह के. जे. जॉर्ज आणि शफी परंबिल यांचा समावेश आहे. गोव्यातील आगामी निवडणुकीसाठी सक्षम उमेदवारांची निवड करणे, त्यांच्या राजकीय कामगिरीचा आढावा घेणे आणि मतदारांशी मजबूत संपर्क असलेल्या चेहऱ्यांना संधी देणे, अशी महत्त्वाची जबाबदारी या समितीवर असणार आहे.

गोकुळच्या निकालाचे महाराष्ट्राच्या राजकारणात काय पडसाद उमटणार? सतेज पाटील यांनी दिले मोठे संकेत

या नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना सतेज पाटील यांनी गोव्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या साथीने निवडणुकीची तयारी करण्याचा निर्धार व्यक्त केला. स्थानिक जनतेशी घट्ट नाळ जोडलेले आणि जनतेच्या प्रश्नांची जाण असलेले उमेदवार निवडण्यावर आपला भर राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. पक्षाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मजबूत उमेदवार निवडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळवून देण्यासाठी पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकजुटीने काम करतील, असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला आहे. स्क्रीनिंग कमिटीच्या माध्यमातून योग्य उमेदवारांची निवड करून गोव्यात काँग्रेसची ताकद वाढवण्याचे उद्दिष्ट पक्षाने ठेवले आहे. त्यामुळे या समितीच्या कामगिरीकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

<blockquote class=”twitter-tweet”><p lang=”en” dir=”ltr”>Grateful to Congress President Shri @kharge ji, Leader of Opposition Shri @RahulGandhi ji, AICC General Secretary Shri @kcvenugopalmp ji and the entire party leadership for entrusting me with the responsibility of being a member of the screening committee for the upcoming Goa Assembly elections along with Shri @thekjgeorge ji and Shri @shafi_parambil_ ji. Together with our @INCGoa workers, we will work to field strong candidates rooted in the people and win the elections in Goa. @INCIndia</p>&mdash; Satej (Bunty) D. Patil (@satejp) <a href=”https://x.com/satejp/status/2122558683838357734?ref_src=twsrc%5Etfw”>November 17, 2026</a></blockquote> <script async src=”https://platform.x.com/widgets.js” charset=”utf-8″></script>

follow us

संबंधित बातम्या