दिवाळी विशेष भागात सोनाली कुलकर्णी येणार ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर; होणार मनोरंजनाची आतिषबाजी
Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर या वर्षीची दिवाळी एका खास मराठी अंदाजात साजरी होणार आहे. कारण या सणाच्या
Kon Honar Crorepati : ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर या वर्षीची दिवाळी एका खास मराठी अंदाजात साजरी होणार आहे. कारण या सणाच्या विशेष भागात होस्ट माधुरी दीक्षितसोबत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सहभागी होणार आहे. या दिवाळी विशेष भागात या दोघींमध्ये मजेशीर आणि मनमोकळ्या गप्पा रंगल्या, ज्यातून सोनालीचं मराठी मातीवर असलेलं प्रेम आणि माधुरीनं तिच्या कुटुंबासोबत डेन्व्हरमध्ये साजऱ्या केलेल्या दिवाळीच्या आठवणी शेअर केल्या. या उत्सवातील मराठमोळा रंग आणखी वाढवत, माधुरी आणि सोनाली यांनी पारंपारिक मराठी पोशाखात “आली माझ्या घरी ही दिवाळी” या लोकप्रिय गाण्यावर एकत्र डान्स केला आणि सोबतच्या ढोल-ताशांच्या गजरामुळे हा क्षण अवर्णनीय बनला.
या वेळी, माधुरीनं सोनालीच्या (Sonalee Kulkarni) तमिळ, तेलुगू, मराठी, हिंदी आणि अगदी इटालियन चित्रपटांमधील कामाच्या अनुभवाचा विषय काढला. माधुरीनं (Madhuri Dixit) सोनालीला विचारलं, जेव्हा सोनालीला राग येतो तेव्हा तिच्या तोंडातून सर्वात आधी कोणती भाषा बाहेर पडते? या प्रश्नावर व्यक्त होताना सोनाली म्हणाली, “अगं कार्टे!” आणि मंचावर एकच हास्यकल्लोळ झाला. आपला मराठी बाणा सिद्ध करताना सोनाली म्हणाली की, स्वतःचं वर्णन करण्यासाठी मला ‘हार्डकोर’ हा इंग्रजी शब्द देखील वापरावासा वाटत नाही, इतकी मी “अस्सल मराठी” आहे.
चक्रीवादळ ‘मुरसू’ चा महाराष्ट्राला धोका; पुणे, नाशिकसह ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट –
या गप्पांदरम्यान माधुरी जुन्या आठवणींमध्ये रमली आणि तिनं डेन्व्हरमधील तिच्या दिवाळीच्या सेलिब्रेशनची आठवण सांगितली. तिची मुलं लहान असताना ती त्यांच्यासाठी फटाके आणायची मात्र त्या फटाक्यांना इथल्या सारखी सर नव्हती. त्यातली लड अगदी पेटवल्या पेटवल्या संपून जायची. यावर आपल्या मिश्किल शैलीत सोनाली म्हणाली, “आणि आमच्या इथल्या लक्ष्मी बॉम्ब वर तुझे फोटो असायचे!” या धम्माल गप्पा आणि आणखी मजेदार आठवणींसाठी पहात रहा, ‘कोण होणार करोडपती’चा हा दिवाळी विशेष भाग शनिवार रात्री 9 वाजता सोनी मराठी आणि सोनी लिव वर.