दिलेला शब्द पाळला! दिवाळीपूर्वीच एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 391 कोटींचा निधी मंजूर

ST Employees Diwali Salary; दिवाळीपूर्वीच एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळावा, यासाठी 391.02 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी मिळाली.

ST Employees Diwali Salary Pratap Sarnaik

ST Employees Diwali Salary Pratap Sarnaik: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) सुमारे 83 हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दिवाळी सणासाठी कपडे, फराळ, मिठाई, घरातील सजावट आणि इतर आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी खर्च येतो. त्यामुळे सणापूर्वीच वेतन मिळाल्यास एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीचा खर्च भागवणं सोपं होईल. कर्मचाऱ्यांना सणापूर्वी पगार मिळावा, यासाठी राज्य सरकारने एसटी महामंडळाला 391.02 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील शासन निर्णयही जारी करण्यात आला.

पुण्यात 25 हून अधिक जणांचं पोलीस संरक्षण काढलं; राणा सूर्यवंशी आणि लक्ष्मण हाके यांना मात्र अभय

एसटी कर्मचाऱ्यांना साधारणपणे दर महिन्याच्या 7 ते 10 तारखेदरम्यान वेतन मिळत असते. मात्र, यंदा 6 नोव्हेंबरपासून दिवाळी सुरू होत असल्याने कर्मचाऱ्यांना सणापूर्वीच पगार मिळावा, यासाठी परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी पाठपुरावा केला होता. त्यानंतर शासनाने आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिली.

प्रवासी सवलतींच्या प्रतिपूर्तीसाठी निधी

एसटी महामंडळाला मंजूर झालेला 391.02 कोटी रुपयांचा निधी सप्टेंबर 2026 मधील प्रवासी सवलतींच्या प्रतिपूर्तीपोटी देण्यात येणार आहे. महिला सन्मान योजना, ज्येष्ठ नागरिकांसह विविध प्रवासी सवलतींचा आर्थिक भार महामंडळावर पडतो. या योजनांपोटी सरकारकडून मिळणारा निधी महामंडळाच्या आर्थिक नियोजनासाठी महत्त्वाचा ठरतो.

इस्रायलमध्ये सत्तेसाठी ‘महाराष्ट्र पॅटर्न’ सारखं राजकीय गणित?, नेतान्याहूंसमोर 8 पर्याय; किंगमेकर कोण?

वेतन वितरणाचे सरनाईक यांचे निर्देश

एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन मिळावे, यासाठी परिवहन विभाग आणि एसटी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश प्रताप सरनाईक यांनी दिले होते. “एसटी ही केवळ परिवहन सेवा नसून महाराष्ट्रातील लाखो नागरिकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. या सेवेला अहोरात्र कार्यरत ठेवणारे अधिकारी आणि कर्मचारी हे महामंडळाचे खरे बळ आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनाही दिवाळीचा सण आनंदाने साजरा करता यावा, ही आमची प्रामाणिक भूमिका आहे. कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन मिळावे, यासाठी आम्ही दिलेला शब्द पाळण्याच्या दिशेने शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता एसटी प्रशासनाने वेतन वितरणाची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

follow us