राज्यात शाळांना दिवाळीची 13 दिवसांची सुट्टी ;16 नोव्हेंबरपासून पुन्हा वर्ग सुरू

Diwali Vacation : राज्यातील मान्यताप्राप्त प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळ दिवाळीनिमित्त 2 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर 2026

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Diwali Vacation

Diwali Vacation : राज्यातील मान्यताप्राप्त प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळ दिवाळीनिमित्त 2 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर 2026 या कालावधीत बंद राहणार असल्याची माहिती राज्य शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. राज्य शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवार, 16 नोव्हेंबरपासून पुन्हा वर्ग सुरु होणार आहे. दिवाळीनिमित्त राज्य शिक्षण विभागाकडून 13 दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

राज्य शिक्षण विभागानुसार (State Education Department) , दिवाळीच्या या सुट्टीमध्ये (Diwali Vacation) धनत्रयोदशी (6 नोव्हेंबर), दिवाळी पाडवा/बलीप्रतिपदा (10 नोव्हेंबर) आणि भाऊबीज (11 नोव्हेंबर) हे प्रमुख सण येत आहेत. 16 नोव्हेंबरपासून दुसरे सत्र सुरू होणार असून, त्याच दिवसापासून शाळांमधील नियमित वर्ग पुन्हा सुरू होतील. 2026-27 या शैक्षणिक वर्षाचे पहिले सत्र 15 जून ते 31 ऑक्टोबर असे आहे. तर दुसरे सत्र 16 नोव्हेंबर 2026 ते 1 मे 2027 या कालावधीत असणार आहे. त्यानंतर 3 मे ते 14 जून 2027 या कालावधीत उन्हाळी सुट्टी असेल.

मोठी बातमी! अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक सुजय विखेंसह 8 उमेदवार बिनविरोध

तर दुसरीकडे शाळांना सुट्ट्यांच्या वेळापत्रकात स्वतःहून कोणताही बदल न करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. जर स्थानिक सणांनिमित्त तारखांमध्ये काही बदल करायचा असेल, तर त्यासाठी शिक्षण विभागाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. राज्य शिक्षण विभागाने दिवाळीच्या सुट्टीचे वेळापत्रक आधीच जाहीर केल्याने पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांना प्रवास, कौटुंबिक कार्यक्रम आणि इतर नियोजन करता येणार आहे.

follow us