‘तुझा नेक्स्ट गेम’, प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला जीवे मारण्याची धमकी; प्रताप सरनाईकांनी घेतली पुर्णेकर कुटुंबाची भेट
Pradeep Purnekar Murder Case; पूर्णेकर यांच्या पुतणी खुशबू पूर्णेकर हिला मोबाईलवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
Pradeep Purnekar’s Niece Receives Death Threat, Minister Pratap Sarnaik Visits Purnekar Family: ठाण्यातील मनपाडा परिसरातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांना आता आणखी एका संकटाचा सामना करावा लागत आहे. पूर्णेकर यांच्या पुतणी खुशबू पूर्णेकर हिला मोबाईलवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ‘तुझा नेक्स्ट गेम’ असा धमकीचा संदेश आल्याने कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर पुर्णेकर कुटुंबाला पोलिस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी होत आहे. तसेच प्रदीप पुर्णेकरांच्या हत्येप्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी पूर्णेकर कुटुंबीयांकडून केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर मंत्री प्रताप सरनाईक यांनी पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही फोनवरून कुटुंबीयांशी संवाद साधला. तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही, आम्ही सुरुवातीपासून तुमच्या पाठीशी आहोत, असे आश्वासन सरनाईक यांनी कुटुंबीयांना दिले. प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येचे सर्वांनाच दुःख असून, या प्रकरणात दोषींना भर चौकात फाशी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. या खटल्यासाठी आवश्यक असल्यास आपण वैयक्तिकरीत्या वकिलांची व्यवस्था करू, असेही सरनाईक म्हणाले.
तत्त्वांशी तडजोड नको, काही बाहेरच्या शक्तींमुळं… सरन्यायाधीश सूर्यकांत तरुण वकिलांसमोर थेट बोलले
या प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू आहेत. पूर्णेकर कुटुंबीयांशी एकनाथ शिंदे यांच्याबाबत गैरसमज करून घेऊ नका,असे आवाहन केले. काही नेत्यांनी या प्रकरणातून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत सरनाईक यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
केतन अग्रवाल हत्येप्रकरणी उज्वल निकमांची नियुक्ती! केतनच्या वडिलांनी मानले फडणवीसांचे आभार
दरम्यान, प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी शिंदेंच्या शिवसेनेतील पदाधिकारी मीनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीवर आरोप होत असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रताप सरनाईक यांनी पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेतल्याने या प्रकरणाला राजकीय वळणही मिळाले आहे. खुशबू पूर्णेकर यांना आलेल्या धमकीच्या संदेशामुळे कुटुंबीयांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.