केतन अग्रवाल हत्येप्रकरणी उज्वल निकमांची नियुक्ती! केतनच्या वडिलांनी मानले फडणवीसांचे आभार

Ujjwal Nikam Appointed in Ketan Agrawal Murder Case; केतन अग्रवाल हत्येप्रकरणी उज्वल निकमांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली.

Ujjwal Nikam Appointed in Ketan Agrawal Murder Case

Ujjwal Nikam Appointed in Ketan Agrawal Murder Case: पुण्यातील लोहगड येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केतनच्या वडिलांनी या प्रकरणाचा खटला प्रभावीपणे लढवण्यासाठी निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य झाल्यानंतर अग्रवाल कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले असून, आपल्या मुलाला न्याय मिळेल, अशी आशा व्यक्त केली आहे.

अभिजीत दिपकेंना न्यायालयाकडून सशर्त जामिन मंजूर, वर्षभर शांतता राखण्याचं हमीपत्र द्यावं लागणार

या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या आरोपपत्रानुसार, 18 जून 2026 रोजी केतनला लोहगड किल्ल्यावर नेण्यात आले होते. तिथे त्याला दरीत ढकलून हत्या केल्याचा आरोप सिया आणि चेतन यांच्यावर आहे. सुरुवातीला ही घटना अपघात असल्याचे भासवण्यात आल्याचा संशयही पोलिसांनी व्यक्त केला आहे. तपासादरम्यान डिजिटल पुरावे, चॅट्स आणि साक्षीदारांचे जबाब यांच्या आधारे पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. मात्र, आरोपींवरील आरोप न्यायालयात सिद्ध होणे बाकी आहे.

पोटाची खळगी कशी भरणार? रोजगार हमी योजनेचं मराठवाड्यातील भयाण वास्तव; मजुरीत कधी अन् किती रुपयांची वाढ?

आता या प्रकरणात उज्ज्वल निकम सरकारी पक्षाची बाजू मांडणार असल्याने खटल्याच्या पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोषींना कठोर शिक्षा व्हावी आणि आपल्या मुलाला न्याय मिळावा, अशी अपेक्षा केतनच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.

follow us