‘बीव्हीजी’कडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 1 कोटींची मदत; हणमंतराव गायकवाड यांनी फडणवीसांकडे सुपूर्द केला धनादेश

BVG India Chief Minister Relief Fund: आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी बीव्हीजीचा पुढाकार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनादेश सुपूर्द

BVG India Chief Minister Relief Fund: आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी बीव्हीजीचा पुढाकार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनादेश सुपूर्द

BVG India Chief Minister Relief Fund Donation: नैसर्गिक आपत्ती आणि संकटाच्या काळात गरजू नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी भारत विकास ग्रुप (BVG) पुढे सरसावला आहे. बीव्हीजी इंडिया लिमिटेडच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी बीव्हीजीचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड (Hanmantrao Gaikwad) यांच्याकडून मदतीचा धनादेश स्वीकारला.

पुण्याचे पोलीस आयुक्त कुणाचेही ऐकत नाहीत, ते फक्त…रोहित पवारांनी काय सांगितलं?

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळ निवारण आणि आपत्तीग्रस्तांना मदत करण्यासाठी आर्थिक योगदान देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत बीव्हीजीने एक कोटी रुपयांचे योगदान दिले. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हा निर्णय घेतल्याचे हणमंतराव गायकवाड यांनी सांगितले.

Video : सुनेत्रा पवारांना अजितदादांसारखं काम जमत नाही?; रोहित पवारांनी वेगळाच सूर लावला

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘महाराष्ट्र पब्लिक रिलीफ सोसायटी’ची स्थापना करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्ती आणि संकटांमुळे बाधित झालेल्या नागरिकांना तातडीने आर्थिक व आवश्यक मदत उपलब्ध करून देणे, तसेच कर्करोग, हृदयरोग, मूत्रपिंड विकार आणि अवयव प्रत्यारोपण यांसारख्या गंभीर आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक सहाय्य करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. सीएसआर निधी, दानशूर व्यक्ती आणि सामाजिक संस्थांच्या सहभागातून मदतीचा हा उपक्रम अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न आहे.

बीव्हीजी समूह स्वच्छता, औषधनिर्मिती, अन्नप्रक्रिया, शेती विकास, सेंद्रिय शेती, महिला शिक्षण आणि महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांत कार्यरत आहे. महाराष्ट्रात समूहाकडून महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा अर्थात 108 रुग्णवाहिका सेवेचे संचालनही केले जाते. गेल्या 12 वर्षांपासून ही सेवा राज्यात अविरतपणे कार्यरत आहे.

‘विद्येचे माहेरघर असलेले पुणे आता कोयता नगरी बनत आहे’; सुषमा अंधारेंचा पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेवरून घणाघात

सामाजिक बांधिलकी जपत बीव्हीजी इंडिया लिमिटेडच्या वतीने सीएसआरअंतर्गत विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सेवाभावी संस्थांना आतापर्यंत एकूण एक कोटी रुपयांचे आर्थिक सहकार्य करण्यात आले आहे. समाजातील गरजू घटकांना मदत करण्याची ही परंपरा यापुढेही कायम ठेवण्याचा समूहाचा प्रयत्न आहे.

follow us