‘ज्या चळवळीसाठी आयुष्य दिलं, त्यातीलच लोकं टीका करताहेत’; मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष शरणकुमार लिंबाळेंची खंत!

Sharankumar Limbale: मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाकडे जातीच्या चष्म्यातून पाहू नका, असं शरणकुमार लिंबाळेंचं टीकाकारांना आवाहन.

Sharankumar Limbale on Marathi Sahitya Sammelan Criticism

Sharankumar Limbale on Marathi Sahitya Sammelan Criticism: 100 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांच्यावर होत असलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाकडे जातीच्या चष्म्यातून पाहू नका, असं आवाहन त्यांनी टीकाकारांना केलं आहे.

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना मोठा राजकीय धक्का; माजी जिल्हा परिषद अध्यक्षाचा राजीनामा; कारण काय?

दलित चळवळीत अनेक गट पडले असून, त्यातीलच एका गटाकडून आपल्यावर टीका होत असल्याचं लिंबाळे यांनी म्हटलं. ज्या चळवळीसाठी संपूर्ण आयुष्य दिलं, त्याच चळवळीतील काही लोक आपल्यावर टीका करत आहेत, याची खंतही त्यांनी व्यक्त केली. मराठी समाजाकडून टीका होत नसून आंबेडकरी समाजातीलच काही लोकांकडून विरोध केला जात असल्याचं ते म्हणाले.

Mandar Kiwale : माझ्याकडे पाहा, तू वाचणार… मदतीसाठी मंदारकडे धावलेल्या महिला वकिलाने सांगितला थरार…

या टीकाकारांनी चळवळीच्या संदर्भात गांभीर्याने बोललं पाहिजे, असंही लिंबाळे यांनी सुनावलं. हे शतक महोत्सवी साहित्य संमेलन असून, हा मानाचा आणि सन्मानाचा क्षण आहे. सामाजिक न्यायासाठी लेखन करणाऱ्या आंबेडकरवादी लेखकाचा गौरव होत असताना त्याला गालबोट लावू नये, एवढी औपचारिकता तरी टीकाकारांनी पाळली पाहिजे, असं स्पष्ट उत्तर शरणकुमार लिंबाळे यांनी दिलं.

follow us