‘वेळ ओळखून डाव टाकता आला पाहिजे’; सुजय विखेंनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड होताच केला अनेक राजकीय घडामोडींचा खुलासा!
Sujay Vikhe Patil on District Bank Election: सुजय विखे पाटलांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड होताच केला अनेक राजकीय घडामोडींचा खुलासा!
Sujay Vikhe Patil on District Bank Election: अहिल्यानगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी खासदार आणि भाजप नेते डॉ. सुजय विखे पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीनंतर त्यांनी ‘लेट्सअप मराठी’शी संवाद साधताना जिल्ह्याच्या राजकारणातील पडद्यामागच्या घडामोडी, ज्येष्ठ नेत्यांसोबत झालेल्या चर्चा, बँकेच्या कारभारातील खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांची भूमिका आणि नगर-मनमाड रस्त्याच्या कामाबाबत भाष्य केले. ‘मी गेली दोन वर्षे सत्तेपासून लांब पळतोय, पण सत्ता माझ्यामागे येत आहे, हा पांडुरंगाचा चमत्कारच आहे,’ असे ते म्हणाले.
पुणे कोर्ट गोळीबाराच्या थरारात दोन सूत्रधार पुण्यातून तर तीन हल्लेखोर दौंडमधून ताब्यात
‘विखे पाटलांनी तडजोड केली तर ते पाप ठरते’
अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राजकीय समीकरणांबाबत बोलताना सुजय विखे म्हणाले, “राजकारणात एक गोष्ट फार महत्त्वाची आहे, ती म्हणजे वेळ ओळखून डाव टाकता आला पाहिजे. जर तुम्ही मीच सगळ्यात मोठा या भूमिकेत गेलात, तर तुम्ही काहीच मिळवू शकत नाही. मला एकटा गुलाल न घेण्याची संधी मिळाली आहे. शेवटी राजकारणात पडद्यामागे ज्या गोष्टी घडायच्या त्या घडल्या. आता आमचं दुर्दैव असं आहे की, अहिल्यानगरच्या राजकारणात सगळ्यांना सगळं करायची परवानगी आहे. जसे की, तडजोडी, चर्चा, बैठका; पण हेच जर विखे पाटलांनी केलं तर ते पाप होतं. अशा प्रकारचे चित्र महाराष्ट्रात उभे केले जाते, हे मला वाटतं चुकीचं आहे.”
अध्यक्षपदाची जबाबदारी कशी मिळाली?
जिल्हा बँकेच्या निवडणुकीपूर्वी आपण ही जबाबदारी स्वीकारण्यास तयार नसल्याचे वडील आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांना सांगितले होते, असे त्यांनी स्पष्ट केले.
WhatsApp चं बहुप्रतीक्षित फीचर अखेर रोल आऊट; 14 दिवस आधी शेड्यूल करता येणार मेसेज, फोटो अन्…
“मी राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना म्हटलं होतं की, जिल्हा बँकेची नवीन जबाबदारी घ्यायला मी तयार नाही. पण त्यांनी मला समजावून सांगितलं की, बँक व्यवस्थितपणे चालवावी लागणार आहे. तेथे ज्या गोष्टी योग्य वाटत नाहीत, अशा गोष्टींना ‘नाही’ म्हणणारा या जिल्ह्याच्या राजकारणात फक्त तूच आहेस. माझा हाच ‘नाही’ म्हणण्याचा स्वभाव बाळासाहेब थोरातांनाही पटला आणि ते म्हणाले, बँक चालवायला असाच माणूस हवा. मग या निर्णयाला सगळ्या नेत्यांनी मंजुरी दिली आणि शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी या निर्णयाला हिरवा कंदील दाखवला.”
पदाला योग्य न्याय देता येत नसल्याचे वाटल्यास आपण स्वतःहून ते सोडू, असेही त्यांनी सांगितले. “ज्या दिवशी मी या पदाला योग्य न्याय देऊ शकलो नाही, असं मला वाटेल तेव्हा मी हे पद योग्य व्यक्तीला सोपवेल,” असे विखे म्हणाले.
‘सत्तेसाठी लालची असल्याचा अनेकांचा गैरसमज’
जिल्ह्यातील नेत्यांशी जुळवून घेताना चार महिन्यांची मेहनत घेतल्याचे विखे यांनी सांगितले. प्रत्येक घडामोडीची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली जात होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सत्तावाटपाचा काही फॉर्म्युला ठरला होता का, या प्रश्नावर ते म्हणाले, “अजिबात नाही. एकदा बाळासाहेब थोरात मला म्हणाले होते, जर उद्या तुला बँकेची जबाबदारी पेलवली नाही, तर मी तुझा राजीनामा घेऊ शकतो का? तेव्हा मी त्यांना तात्काळ ‘हो’ असं उत्तर दिलं. माझ्याबाबत अनेकांचा गैरसमज झाला आहे की, मी सत्तेसाठी फार लालची माणूस आहे; पण तसं अजिबात नाही. मी गेली दोन वर्षे सत्तेपासून लांब पळतोय, पण सत्ता माझ्यामागे येत आहे, हा पांडुरंगाचा चमत्कारच आहे. मला आजही सांगितलं राजीनामा दे, मी द्यायला तयार आहे.”
‘पराभवाला मी स्वतःला जबाबदार धरलं’
राजकारणातील विजय आणि पराभवाबाबतही विखे यांनी आपली भूमिका मांडली. “कोणी कोणाला पराभूत करू शकत नाही. माणूस त्याच्या कष्टाने निवडून येतो आणि पराभूत त्याच्याच चुकीमुळे होतो. या जिल्ह्याच्या इतिहासात जे जे पराभूत झाले, त्यांनी कोणाला ना कोणाला तरी दोष दिलेला आहे. पण माझ्या मागच्या तीन वर्षांत मी पराभूत झालो तेव्हा एकदाही एकालाही दोष दिलेला नाही. मी माझ्यामुळे, माझ्या स्वभावामुळे, लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू न शकल्यामुळे पडलो,” असे त्यांनी सांगितले.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! पुढील 3 महिने मोफत धान्य मिळणार
जिल्ह्यातील नेत्यांनी वैयक्तिक पातळीवर टीका न करण्याचा आणि भाषणाची पातळी न सोडण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्याच्या राजकारणातील सुसंस्कृतपणा टिकवून ठेवणार असल्याचे विखे म्हणाले.
बँकेच्या कारभारात खासदार निलेश लंकेंचं स्थान काय?
जिल्हा बँकेच्या कारभारात खासदार नीलेश लंके यांचे स्थान काय असेल, या प्रश्नावर विखे म्हणाले, “ते संचालक म्हणून बँकेत येतील. त्यांना एखाद्या मुद्द्यावर आक्षेप असेल, तर त्यांचा आक्षेप नोंदवला जाईल. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचा मी पाठपुरावा करणार. सहकाराशी निगडित असलेला पारनेर तालुक्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातूनच घेतला जाईल. कारण ते तेथील लोकनियुक्त संचालक आहेत.”
मात्र, बँकेच्या कारभारात गैरप्रकार झाल्याचा आरोप करून आरबीआयकडे तक्रार केल्यास त्याचा परिणाम शेतकऱ्यांवर होऊ शकतो, असेही त्यांनी म्हटले. “समजा, जिल्हा बँकेत चुकीचा ठराव किंवा गैरप्रकार झालाय असा आरोप त्यांनी केला आणि आरबीआयला तक्रार केली, आणि आरबीआयने जिल्हा बँकेचं अकाऊंट सील केलं, तर त्याचा फटका शेतकऱ्यांना बसेल. मग त्यांच्या तक्रारीने शेतकरी सावकारांच्या ताब्यात आणून दिला जात असेल, तर या आरोपांनी ते जगू शकत असतील तर त्यांनी ते करावं,” अशी टीका त्यांनी केली.
नगर-मनमाड रस्त्याचे काम दोन महिन्यांत पूर्ण होणार
नगर-मनमाड रस्त्याच्या कामाबाबतही सुजय विखे यांनी महत्त्वाची माहिती दिली. या रस्त्याचे काम पुढील दोन महिन्यांत पूर्ण होईल, असा दावा त्यांनी केला. याचे श्रेय कोणाला द्यायचे, यावर बोलताना त्यांनी खासदार नीलेश लंके आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा उल्लेख केला.
राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; CBI-ED चौकशीचा आदेश रद्द, मात्र न्यायालयीन लढाई कायम!
“नगर-मनमाड रस्त्याचं काम पुढच्या दोन महिन्यांत पूर्ण होईल. त्याचं श्रेय लंकेंना द्या, नाहीतर गडकरी साहेबांना द्या, मला शेवटी द्या,” असे मिश्किलपणे सुजय विखे म्हणाले.