राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; CBI-ED चौकशीचा आदेश रद्द, मात्र न्यायालयीन लढाई कायम!
Rahul Gandhi Supreme Court Relief: कथित बेहिशेबी संपत्ती प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.
Rahul Gandhi Supreme Court Relief: कथित बेहिशेबी संपत्ती प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या संपत्तीची CBI आणि ED मार्फत चौकशी करण्याचे निर्देश अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) हा आदेश रद्द केला आहे. मात्र, हे प्रकरण पूर्णपणे संपलेले नाही. नव्याने सुनावणी घेताना राहुल गांधी यांची बाजू ऐकून ऐकून घ्यावी, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
पुरुषांच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करणाऱ्या महिला स्वतःच जगतात जास्त : UNFPA
कर्नाटकमधील भाजप कार्यकर्ते एस. विग्नेश शिशिर (S Vignesh Shishir)यांनी राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे ज्ञात उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात CBI आणि ED चौकशीची मागणी करत त्यांनी मे 2026 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात याचिका दाखल केली होती.
नेमका आरोप काय होता?
राहुल गांधी यांनी परदेश दौऱ्यांवर त्यांच्या ज्ञात उत्पन्नापेक्षा जास्त खर्च केल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता. त्यांच्या परदेश दौऱ्यांवर सुमारे 60 कोटी रुपये खर्च झाल्याचा आणि हा खर्च त्यांच्या उत्पन्नापेक्षा अधिक असल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला होता.
7 दशकांची परंपरा मोडली! एका मुलाची आई बनली ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेचे नियम नेमके काय बदलले?
या याचिकेवर सुनावणी करताना लखनौ खंडपीठाने CBI आणि ED यांना तक्रारीची पडताळणी करून प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. 20 जुलै रोजी CBIने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर न्यायालयाने असमाधान व्यक्त करत नव्याने अहवाल मागवला होता.
सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. सरन्यायाधीश सूर्य कांत (CJI Surya Kant), न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. राहुल गांधी यांच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी बाजू मांडली.
पंकज त्रिपाठींच्या उपस्थितीत रंगला ‘एक तिची गोष्ट’चा रौप्यमहोत्सवी प्रयोग
याचिकाकर्त्याचा या प्रकरणाशी थेट संबंध नाही. केवळ राजकीय हेतूने आणि कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर करून ही याचिका दाखल करण्यात आल्याचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. तसेच, राहुल गांधी यांची बाजू ऐकून न घेताच उच्च न्यायालयाने चौकशीचे निर्देश दिल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.
यापूर्वी 17 ऑगस्ट 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या पुढील कामकाजाला अंतरिम स्थगिती दिली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने चौकशीचे निर्देश देणारा आदेश रद्द करत हे प्रकरण नव्याने ऐकण्यास सांगितले आहे.
त्यामुळे अलाहाबाद उच्च न्यायालयात या प्रकरणाची पुन्हा सुनावणी होणार आहे. यावेळी राहुल गांधी यांना पक्षकार करून त्यांची बाजू ऐकून घेतली जाणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राहुल गांधी यांना दिलासा मिळाला असला, तरी त्यांच्याविरोधातील न्यायालयीन लढाई अद्याप संपलेली नाही.